​​​Nirankar Shikshan Prasarak Manadal

          " NIRANKAR VASTIGRAH​​ "      
INTERNATIONAL CSR AWARD WINING NGO -Feb - 2019 & 2020 & Feb- 2021 & 2022




Date - 22/02/2021
      नमस्कार संस्थेच्या वतीने एका गरीब कुटुंबातील दोन लहान मुलींना शैक्षणिक साहित्य मदत करण्यात आली. मला चार दिवसांपूर्वी आमचे आदरणीय आदित्य सरांनी या गरीब कुटुंबातील दोन लहान मुलींना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी विनंती केली होती. आणि या कुटुंबा बद्दल माहिती दिली.विशेष म्हणजे या दोन्ही मुली अभ्यासात हुशार आहे आणि अभ्यास करण्यासाठी शालेय साहित्य जवळ नाही. तसेच या मुलींची आई हि स्वतः लहान पणापासून पुण्यातील नामांकित संस्थेत अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. पण मुलींना वडील नसल्याने सर्व जबाबदारी आईवर येऊन पडली आहे.
       वरील सर्व माहिती ऐकल्यावर मी लगेचच मुलींना सर्व शैक्षणिक साहित्य दिले. या मदत करण्यामागे माझी एकच भावना आहे की गरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये. कारण आज मला माझ्या कायदेविषयक शिक्षणासाठी माझे आदरणीय श्री. काकासाहेब गलांडे, वडगाव शेरी, पुणे.हे करत आहेत. समाजात असे खूप विद्यार्थी आहेत की त्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्यांच्या पर्यंत शैक्षणिक मदत पोहचत नाही. मला जसं जमेल तसं माझ्या परीने समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि मदत करत आहे.
आपणांस मनापासून विनंती आहे की जर तुम्हाला काही शैक्षणिक मदत करायची असेल तर मला कळवावे.
आपला सेवक.
श्री.केशव धेंडे,सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ.
( International CSR Award Wining NGO )

Date - 12/03/2020

       नमस्कार आज आपणांस सांगण्यास आनंद होतो आहे की आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि कायम स्वरुपी लक्षात राहण्यासारखा आहे.आजचा दिवस खरोखरच खूप छान होता.
     ह्यासाठी निमित्त होते ते म्हणजे माझे आदरणीय मित्र आणि माझ्या एका शब्दाला मान देणारे तसेच गरीब, गरजवंताना सामाजिक क्षेत्रात मोठ्या निर्मळ मनाने आर्थिक, शैक्षणिक आणि इतर कार्यात मदत करणारे मा. काकासाहेब गलांडे ह्यांची पुण्याई म्हणावी लागेल.आजचा दिवस खरोखरच खूप छान होता.आज एकाच दिवशी आपले लाडके दैवत शिवाजी महाराज यांची जयंती आणि संकष्ट चतुर्थी आली होती. आजच्या दिवशी काकांनी माझ्या एका शब्दावर मला नवीन अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम उभारणीसाठी भरीव आर्थिक मदत केली.या साठी मी हृदयापासून काकांचे आभार मानतो.
    आजच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा मान मला काकासाहेब यांच्या मुळे मिळाला या बद्दल मी स्वतः काकासाहेब यांचे आणि दोस्ती ग्रुप मंडळाचे मनापासून आभार मानतो.

Date - 31/08/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 20/02/2020

        नमस्कार काल एका वेगळ्या कार्यक्रमात Chief Guest म्हणून मला निमंत्रण दिले होते आणि दुसरे Chief Guest म्हणून मा. गिरीश कट्टी सर ( Sels Tax - Assistant Commissioner , Pune.) हे होते.
विशेष कार्यक्रम म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम होता. " Arunachal Students Welfare Association Pune. ASWAP " ( Apsum Foundation Day ) या कार्यक्रमात सम्पूर्ण महाराष्ट्रातील काॅलेज मध्ये शिकणारे Students जमा झाले होते. सर्व वातावरण अरुणाचल प्रदेशमय झाले होते. या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून मला संस्थेच्या कार्याची माहिती देण्यासाठी बोलायला मिळाले.आणि खास अरुणाचल प्रदेश चा पेहराव देऊन माझा सत्कार करण्यात आला.खरोखरच खूप छान वाटले या सर्वांच्या बरोबर. गिरीश सरांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले.
      या कार्यक्रमात स्टुडंट्स यांनी अरुणाचल प्रदेशच्या संस्कृतींचे डांस मधून दर्शन घडविले. खरोखरच या कार्यक्रमात येण्याचे भाग्य मला मिळाले या बद्दल मी Apsum Foundation चे आणि सर्व टिमचे मनापासून खूप आभार मानतो.

Date - 22/04/2021
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी माझे आदरणीय मित्र मा.श्री. मोहनीश जाधव सर,(शिवसेना, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष, पुणे.) आणि आदरणीय सौ.रुपालीताई हेमंत वा॑बुरे,( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - उपाध्यक्ष, पर्वती विधानसभा मतदारसंघ, पुणे शहर) तसेच यांचे सर्व आदरणीय कार्यकर्ते आले होते. संस्थेत आल्यावर सर्व नवीन पाहुणे मंडळींना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
       संस्थेच्या भेटीसाठी येण्याचे कारण म्हणजे मोहनीश जाधव सरांच्या मित्राचा वाढदिवस संस्थेच्या मुलांच्या बरोबर साजरा करण्यासाठी आले. सर्व मुलांच्या बरोबर केक कापण्यात आला.आणि सर्व मुलांना मास्क वाटण्यात आले.
सर्व पाहुणे मंडळी संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 16/06/2019

        नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुणे येथील ZinZout Teletech , Pune. या कंपनीचे संचालक मा.श्री.मयुर राऊत सर आणि Sinhgad Institute Of Technology , Lonavala येथील काॅलेजचे स्टुडंट्स आले होते.
या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच इतर प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.दोन तास संस्थेत थांबून सर्व मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मुलाला बक्षिस दिले.या ठिकाणी कंपनीतील सर्वांना खूप छान वाटले तसेच त्यांच्या नवीन कंपनी विषयी सविस्तर माहिती दिली.
     ZinZout Teletech,Pune. या कंपनीचे मा.श्री.मयुर राऊत सर आणि स्टुडंट्स संस्थेच्या भेटीसाठी आल्या बदल आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो.

Date - 04/06/2019 - BIRTHDAY CELIBRATION

DATE - 01/06/2021 -  VAISHALI MADAM BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS

Date - 08/02/2020

    नमस्कार आज संस्थेला भेट देण्यासाठी सिम्बायोसिस काॅलेजचे विद्यार्थी आले होते.या सर्वांनी संस्थेत दिवसभर राहून वेगवेगळ्या प्रकारचे Activity घेतल्या आणि त्याचा भरपूर आनंद घेतला. या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांना Social Activities बाबत मार्गदर्शन केले.खरोखरच या तरुण विद्यार्थ्यां बरोबर खुप छान वाटले.
        तसेच दुसऱ्या एका कार्यक्रमात माझे आदरणीय वकील मित्र संस्थेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. Adv. Saurbhi Butke Madam यांचा वाढदिवस साधेपणाने संस्थेत साजरा केला. यासाठी त्यांचे जवळचे वकील मित्र त्यांच्या बरोबर आले होते. Adv. Sorbhi मॅडमानी मला त्यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने छान व सुंदर भेट वस्तू दिली. या बद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो.
       संस्थेच्या भेटीसाठी सिम्बायोसिस काॅलेजचे तरुण विद्यार्थी आणि आदरणीय वकील मित्र आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून आभार मानतो.

DATE - 26/05/2021 -  BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS


Date - 24/09/2020
      नमस्कार आज सासवड,दिवे गाव येथून येताना माझ्या गाडीच्या समोर " शॅमेलिन सरडा " दिसला. तो मस्तपणे सावकाश चालत जात होता,पण त्याला माहित नव्हते की आपण जंगलातून चालत नसून रहदारीच्या वाटेवरून जात आहे, आणि अचानक तो समोरून येणाऱ्या चार चाकी गाडीखाली जाता जाता वाचला, हे पाहून मी गाडी बाजूला घेतली आणि मग त्या शॅमेलिन सरडयाची शेपूट पकडून रस्त्याच्या कडेला गवतात सोडून दिले.
       आज मला मनाला खूप मोठे समाधान झाले की एका गरीब आणि मुकया प्राण्याचा जीव वाचवला म्हणून.


Date - 12/02/2022
     नमस्कार. आज आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेच्या आश्रमातील माझी तीन मुले ज्यांना मी लहानपणापासून सांभाळले आहेत असे माझे भक्कम आधारस्तंभ बघता बघता कधी मोठे झाले हे कळालेच नाही. हे तीन मुले माझ्या डोळ्यासमोर राहून आणि प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आज स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतः ला सामावून घेतले आहेत.
    तुम्हाला वाटेल यामध्ये काय मोठेपणा पण यांतच खरी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण या माझ्या तीन मुलांना आश्रमात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची स्वतःची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि हलाखीची होती. शिवाय त्यांना त्यांचे भविष्य त्यावेळी अंधारमय वाटले होते.पण शेवटी नशीब आहे म्हणतात ना तसं त्यांना मी माझ्या संस्थेच्या आश्रमात प्रवेश दिल्यामुळे त्यांना आज समाजात मोठ्या मानाने वावरता आले आहे. माझ्या तीन मुलांपैकी प्रणव हा "Government ITI" पास झाला आहे आणि त्याचा छोटा भाऊ चैतन्य हा आता बारावी सायन्स मध्ये शिकत असून त्याला एका संस्थेने " Grafic Design Course" शिकण्यासाठी आर्थिक मदत केली होती म्हणून तो आता पार्ट टाईम जॉब करुन स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आणि मोठा मुलगा विकी हा बारावी नंतर मेडिकल मध्ये जाॅब करून स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. म्हणजे मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की आपण अशी चांगली मुले घडविली तर आपल्या आयुष्यात येऊन आपण काहितरी पुण्य प्राप्त केले आहे याचे मोठे समाधान मिळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हि तिन्ही माझी मुले मला त्यांच्या आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही.
आपला सेवक.
केशव धेंडे,सर.(BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे.(International CSR Award Wining NGO, Pune. Feb - 2019 & Feb - 2020 & American Merit Council Appreciate Certificate - 21/11/2021)

Date - 31/10/2020
   नमस्कार आज संस्थेत वाढ दिवस साजरा करण्यासाठी माझे आदरणीय श्री.विलास लोंढे सर यांच्या वहिनी आदरणीय श्रीमती विशाखा भालेराव ताई आणि त्यांच्या घरातील इतर आदरणीय नातेवाईक मंडळी आले होते.विशेष म्हणजे लोंढे सरांनी ताईंना सांगितले की आपण निरंकार बाल ग्राम मध्ये जाऊन वाढ दिवस साजरा करू यामुळे संस्थेत येऊन वाढ दिवस साजरा करण्यात आला. केक कापून आणि मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
     तसेच आज माझे आदरणीय मित्र आणि तानाजी फिल्म अक्टर श्री.सागर पाबळे हे खास संस्थेच्या भेटीसाठी आले होते. या भेटीत त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.सागर सर हे खूप हरहुन्नरी कलाकार आहेत आणि फिल्म आणि सीरियल मध्ये त्यांनी चांगले काम केले आहे.
      आज संस्थेत वरील सर्व आदरणीय मंडळी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 16/09/2021
      नमस्कार आज खूप महिन्यांनी आर्मीतील रिटायर्ड Col.Surojit Sinha, Sir आणि त्यांचे कुटुंबीय संस्थेच्या भेटीसाठी आले होते. सरांनी संस्थेच्या भेटीसाठी पंधरा दिवस आधी मला फोनवरून संस्थेत येण्यासाठी फोन केला होता.
      संस्थेत येताना सरांनी त्यांच्या कुटुंबीयांना बरोबर घेऊन आले होते. सरांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि संस्थेच्या चालू असलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच माझ्या कार्याचे कौतुक केले. संस्थेत सरांनी एक तास वेळ घालविला आणि सर्व मुलांच्या बरोबर मनसोक्तपणे आनंदाने गप्पा मारल्या. जाताना मॅडम व त्यांच्या मुलांनी सर्व मुलांचे आणि संस्थेचे भरभरून कौतुक केले.
     संस्थेच्या भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.


Date - 15/09/2020
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी हडपसर येथील आजची तरुण पिढीतील समाज सेवक आणि आदरणीय श्री.अशोक जाधव, सर (सि.असि.जि.प. माध्यमिक विभाग, पुणे.) ही मंडळी आली होती.
     हि सर्व आदरणीय मंडळी संस्थेला भेट देण्याचे कारण म्हणजे यातील श्री.सुहास सिंग यांचा वाढ दिवस होता आणि तो साजरा करण्यासाठी आले होते. सुहास सिंग हे आपल्या देशाची सेवा करण्यासाठी मिलिटरीची परीक्षा देत असून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच आदरणीय अकिता जाधव या आता MBA - 2 Year ला आता शिक्षण घेत आहेत. अंकाता ही जाधव सरांची कन्या असून ती प्रथमच संस्थेत आली होती, अंकीताने जेव्हा जवळून संस्थेचे कार्य पाहिले आणि ते पाहून तिला खूप छान वाटले तसेच नंतर तिला अचानक रडायला लागली.एकदम वातावरणच बदलून गेले. तसेच तिच्या बरोबरची आदरणीय मधुरा पवार ही दोन वेळा संस्थेत आली आहे.
     वरील सर्व आदरणीय समाज सेवा मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 05/06/2021
       नमस्कार आज पुन्हा एकदा दोन वेगवेगळ्या गरीब मजुर कुटुंबांना माझ्या संस्थेच्या वतीने धान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली आहे. कोरोणामुळे अजूनही खूप गरीब लोकांना आणि कुटुंबातील लोकांना काम मिळत नसल्याने आणि जवळ पैसे उपलब्ध नाहीत म्हणून स्वतः चे पोट भरण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोणत्या संस्थेकडून आणि व्यक्ती कडून मदत मिळेल या आशेने हि लोक पहात आहे. खरोखरच बाहेर खूप नाजूक परिस्थिती आहे.
        माझ्या संस्थेच्या वतीने मला शक्य होईल तेवढी मदत या कोरोणा काळात गरीबांना करत आहे. माझी समाजाला विनंती आहे की शक्य होईल तेवढी मदत तुमच्या हातून गरीब कुटुंबांना करावी हि नम्र विनंती.मला शक्य होईल तेवढी मदत करत राहणार आहे. आणि यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तींचा आशिर्वाद माझ्या संस्थेच्या पाठिशी राहू दे अशी देवा जवळ प्रार्थना करतो.


DATE - 20/07/2019 -  POSCO COMPANY CSR ACTIVITY - THE LIONKING MOVIE

Date - 23/07/2019

    नमस्कार आज संस्थेला भेट देण्यासाठी बाहेरील पाहुणे मंडळी आली होती. 
प्रथम संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी भारतात काम करणारी कंपनी जी अमेरिकेतील स्थायिक कंपनी आहे.या कंपनीतील 50 तरुण कार्यकर्ते संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी आले होते.या मंडळींनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली तसेच CSR Activitie संदर्भात काम करण्यासाठी तयारी दाखवली.
     दुसऱ्या कार्यक्रमात गुजरात मधील अहमदाबाद येथील दोन स्टुडंट्स जे आता आयुर्वेद क्षेत्रातील BMS चे दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. यांनी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कार्याची माहिती घेतली तसेच भरपूर गप्पा मारल्या आणि संस्थेच्या माध्यमातून Volunteer म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली.
   वरील पाहुणे मंडळी माझ्या संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो.

Date - 27/02/2022
      नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील मेडिकल क्षेत्रातील नामवंत डॉक्टर कुटुंब भेटायला आले होते. डॉ. विक्रम राजगुरू सर आणि डॉ. प्रगती राजगुरू मॅडम.माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती त्यांना अगोदरच सांगितली होती आणि ज्या व्यक्तीने माझ्या संस्थेच्या आणि माझ्या कार्या बद्दल माहिती सांगितली होती ती व्यक्ती कोणी साधारण नव्हती तर मी जेव्हा तरवडे वस्ती, महंमदवाडी येथील डॉ.दादा गुजर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय या संस्थेत कार्यरत होतो तेव्हा तो लहान मुलगा माझा विद्यार्थी होता, त्यावेळी मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बालवाडी वर्ग ते दहावी वर्गातील मुलांना गोष्टी किंवा इतर उपयोगी मार्गदर्शन करायला जायचो. आणि हि गोष्ट आहे सन 1995 To 1997 या काळातील. विशेष सांगायचे म्हणजे आपण जेव्हा शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्या वेळी आपल्या विद्यार्थ्यांना कसं आपले पणाने शिकवितो यांवर त्या शिक्षकांचे त्या विद्यार्थ्यांच्या मनात एक आदर निर्माण होतो. आणि तोच आदर सन्मान मला माझा आदरणीय विद्यार्थी श्री. आशिष राऊत यांनी दिला आहे. आणि एका शिक्षकाला त्याने मोठेपणी एक मोठी " सामाजिक बांधिलकी " ठेवून मला गुरुदक्षिणा दिली आहे या बद्दल मी त्याचे मनापासून आभार मानतो.
      तसेच आमचे आदरणीय डॉ. विक्रम राजगुरू सर आणि डॉ. प्रगती राजगुरू मॅडम यांनी त्यांच्या परीने संस्थेला आर्थिक मदत केली या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 20/04/2021
        नमस्कार प्रथम आपण सर्वांनी मिळून आपल्या कुटुंबाची आणि स्वतः ची या कोरोणा मध्ये काळजी घ्यावी ही विनंती.आजच्या या कोरोनामुळे गरीब लोकांचे आणि अंध अपंग तसेच वृद्धाश्रमातील लोकांना अन्नधान्याच्या बाबतीत अडचणी यायला लागले आहेत. आणि अशा या कठिण परिस्थितीत मला काल "वर्षा फाउंडेशन संचलित उत्तम वृद्धाश्रम" पुणे. या वृद्धाश्रमातील लोकांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत होईल का म्हणून मला फोन आला होता. परंतु काल मी दुपारपर्यंत कोरोणाची लस घेण्यात व्यस्त होतो. पण आज सकाळीच मी या संस्थेला फोन करून अन्नधान्याच्या स्वरूपात मदत होईल असे सांगितले. त्यांना फार आनंद झाला आणि मोठा आधार मिळाला.

         माझ्या संस्थेच्या माध्यमातून मुलांच्यासाठी ठेवलेल्या अन्नधान्यातून त्यांना मदत केली.खर पहाता मी या गरजूंना मदत करणारा कोणी महान व्यक्ती नाही परंतु मला माझ्या कार्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती मदत करतात आणि त्यांच्या या सहकार्यामुळेच मी गरीब कुटुंबांना व गरजवंताना मदत करु शकतो. खरं पहायला या दानशूर व्यक्तींना याचे सर्व श्रेय जातं आहे. तसं मी माझ्या संस्थेच्या वतीने समाजाचे पण खूप आभार मानतो कारण ते माझ्या संस्थेला मदत करतात म्हणून मी इतरांना मदत करु शकतो.

 Date -   12-03-2020


     मित्रांनो आज शिवजयंती व चतुर्थी.... आज या मुहूर्तावर एक नवीन अनाथ आश्रम चालू करण्यासाठी त्या आश्रमात नवीन खाटा तसेच इतर उपयोगी वस्तू घेण्यासाठी मा. केशव धेंडे सरांना फुल ना फुलांची पाकळी आमच्याकडून मदत........ आमच्या राजाचा सण अशा प्रकारे मदत करून साजरा.......

OUR NEW GUEST CHILDREN CELEBRITE RAKSHA BANDHAN CELEBRITE AT NIRANKAR

Date - 03/07/2021
      नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी आणि संस्थेला मदत करण्यासाठी कंपनीचे Employee आले होते. TATA COMMUNICATION LIMITED, DIGHI,PUNE. या कंपनीने CSR ACTIVITI मध्ये माझ्या संस्थेची निवड केली.विशेष म्हणजे पुण्यातील पाच संस्थाची निवड करण्यात आली होती. या पाच संस्था मध्ये मला मदत केली आहे.
      खरोखरच या कोरोना मध्ये TATA COMPANY यांनी समाजाला भरभरून आर्थिक, वस्तू स्वरूपात आणि इतर प्रकारे मोठ्या प्रमाणावर दानशूरपणे मदत केली आहे. या त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आम्ही सर्व जण या कंपनीचे मनापासून आभार मानतो.


DATE - 27/05/2021 -  BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS

Date - 09/04/2020
          नमस्कार , आज माझ्या वस्तीतील तरवडे वस्ती महंमद वाडी येथील गरीब, विधवा महिलांच्या कुटूंबाला सद्याच्या कोरोनामुळे उपासमारीची वेळ येत असल्या कारणाने तसेच हतावरच पोट असणाऱ्या कुटूंबाना माझ्या निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ ,तरवडे वस्ती ,महंमदवाडी , पुणे यांच्या तर्फे धान्य स्वरूपात एकूण 12 कुटुंबाना मदत करण्यात आली आहे . खर पाहता मला तरवडे वस्तीतून एका गरीब महिलेचा फोन आला की सर आम्हाला खायला काहीही नाही तर मदत करावी अशी विनंती केली.
        या कामी माझे आदरणीय मित्र माननीय - पी. एस .आय,पुणे शहर - हनुमंत वामन शिंदे सर (Crime Branch) यांनी मदत केली . आणि शिंदे सरांचे या कामी मला नेहमीच सहकार्य आणि पाठींबा राहिला आहे या बद्दल शिंदे सरांचे मनापासून धन्यवाद मानतो . तसेच माझ्या हाताखाली काम करणारे दोन लेबर याना सुद्धा माझ्या संस्थेतर्फे मदत करण्यात आलेली आहे .
       विशेष सांगायचे तर माझ्या संस्थेत शिल्लक राहिलेल्या धान्यातून आणि माझ्या वतीने गरीबांना मदत केली आहे.या मदतीमध्ये माझ्या संस्थेला सहकार्य करणार्या देणगीदार यांचा माेलाचा हातभार आहे आणि या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

Date - 07/03/2020

       नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी " गरवारे कॉलेज, पुणे येथील काॅलेज विद्यार्थी आणि त्यांच्या बरोबर छोटी मंडळी आली होती.
     या विद्यार्थ्यांनी येण्याचे कारण म्हणजे त्यांची मैत्रीण कु. वैभवी काटे हिचा वाढ दिवस आज होता आणि तो संस्थेत साजरा करण्यात आला. याच निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी चित्र कसं काढायचं आहे ते प्रत्यक्षात कागदावर काढून दाखवले. तसेच वैभवीने तिचा वाढ दिवस कलिंगड कापून साध्या प्रमाणे साजरा केला. तिला मनापासून खूप शुभेच्छा.
     गरवारे कॉलेज चे विद्यार्थी आणि छोटी मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो.

Date - 08/05/2021
      नमस्कार, आपल्या सर्वांना मनापासून विनंती आहे की या कोरोणा मध्ये स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची, सर्व मित्र परीवाराची आणि समाजाची काळजी घ्यावी.
    आज पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीने या कोरोणा काळात एका गरीब कुटुंबाला धान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली आहे. या कुटुंबाला धान्याच्या स्वरुपात मदत करण्यामागे कारण असं की हे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील आहे. नोकरी निमित्ताने गाव सोडून पुण्यात मगरपटटा, हडपसर, पुणे. येथे रहायला आले आहेत. कुटुंबात या दोघां व्यतिरिक्त लहान दोन मुली आहेत. एक मुलगी ह्रदयाच्या आजाराने ग्रस्त आहे. लाॅकडाऊन मध्ये नोकरी गेली आणि मग एका ठिकाणी सेक्युरीटि मध्ये काम करुन कुटुंबातील सदस्यांना जगवण्याचा प्रयत्न चालू आहे. यांनी मला फोन करून धान्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन मी लगेचच त्यांना होकार दिला.
     मला आपणांस एकच सांगावेसे वाटते की समाजात असे अनेक व्यक्ती, कुटुंब, कामगार वर्ग आणि सामान्य गरीब लोकांना मदतीची या कोरोणा काळात गरज आहे. माझ्या संस्थेच्या वतीने माझ्या मुलांच्या घासातील घास अशा गरजवंताना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करतोय. शेवटी हे मी पुण्याच काम माझ्या दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळे करतोय.हयाचे श्रेय समाजातील सर्वांना मी देतोय.

Date - 29/11/2019

       नमस्कार संस्थेच्या भेटीसाठी हडपसर येथील The British Institute, Hadapsar , Pune येथील संस्थेचे पदाधिकारी आले होते.
विशेष म्हणजे या संस्थेचे सर्व पदाधिकारी दुसऱ्या वेळेस संस्थेत आले आहेत.आणि येण्याचे कारण म्हणजे आदरणीय रजणी सोनवणे मॅडम यांचा वाढदिवस साधेपणाने संस्थेत साजरा करण्यात आला. या निमित्ताने सर्वांना पावभाजी चे जेवण देण्यात आले. तसेच संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली.
      या सर्वांचे आभार आणि कौतुक करावेसे वाटते की आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण पण समाजासाठी काहीतरी करावे ह्या भावनेने मदत करत आहेत.
      संस्थेत " British Institute, Hadapsar " या संस्थेचे पदाधिकारी आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून आभार मानतो.



Date - 29/11/2020
नमस्कार आज आळंदी येथील एका मुलांच्या आश्रमातील संस्थेला माझ्या संस्थेच्या माध्यमातून अन्नदान करण्यासाठी धान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली.
हया संस्थेच्या संस्थापकांनी मला एक महिना आधी फोन करून मला धान्याच्या स्वरूपात मदत मिळाली तर बरे होईल असे विचारले होते,कारण कोरोना काळात जेवणासाठी अन्नधान्याची तुटवडा भासू लागला होता. मला फोन केल्यावर मी लगेचच त्यांना धान्य घेण्यासाठी संस्थेत बोलावले होते, पण ते लोक आज संस्थेत आले आणि मग त्यांना मी लगेचच मदत केली.विशेष म्हणजे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे स्वतः अंध होते, त्यांच्या बरोबर संस्थेचे सदस्य आले होते.
माझ्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना मदत करताना एकच विचार केला की जे आपल्या जवळ आहे ते जर दिले तर त्यांची हि गरज दूर होईल आणि त्यांचा आशिर्वाद माझ्या संस्थेला मिळेल.




Date - 30/08/2021
      नमस्कार आज खूप वर्षांनी माझे आदरणीय मित्र आणि सिल्वर लिप, रेडिमेड कपडे शोरूमचे ,सासवड येथील पूर्वीचे मालक श्री. राहूल सुराना सर आणि कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या मंदिराचे सदस्य संस्थेच्या भेटीसाठी आले होते. संस्थेत आल्यावर त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. आणि आस्थेने चौकशी केली.
    सुराना सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गरीब लोकांना आणि अनाथ, निराधार मुलांना मदत करण्याची धडपड असते.ते नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होतात.राहूल सुराना सर आणि कुटुंबातील व्यक्ती तसेच त्यांचे इतर पदाधिकारी संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


DATE - 01/08/2020 - NEW COMPUTER LAB GIFT FROM UPS CO.LTD,(U.S) MAGARPATTA,HADAPSAR,PUNE.(20/06/2020)

Date - 12/12/2020
       नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की माझ्या संस्थेला CSR च्या माध्यमातून Mars International & " TINI - Tata Trusts - The India Nutrition Initiative " मदत करण्यात आली आहे. आम्हाला खूप आनंद झाला की या मदतीसाठी माझ्या संस्थेची निवड करण्यात आली.
      याचे सर्व श्रेय जाते ते आमचे आदरणीय सर श्री.सत्या नटराजन यांना. कारण यांना Bhumi Organization यांनी माझ्या संस्थेच्या बद्दल कार्याची माहिती दिली होती, सरांनी संस्थेचे ऑनलाईन कार्य पाहून मला मदत केली.
     माझ्या संस्थेला आदरणीय सत्या नटराजन सर आणि " TINI - Tata Truts " तसेच " Bhumi Organization " यांनी मदत केली या बद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो.


Date - 07/07/2021
   नमस्कार आज " WORLD PEACE UNIVERSITY, MIT COLLAGE, Kothrud, Pune, , येथील काॅलेज मधील एका विचारांच्या तरूण मुला मुलींनी " FRIENDS " नावाचा एक ग्रुप तयार केला. आणि ग्रुपमध्ये सर्व तरुण जनरेशन असल्याने त्यांनी समाजासाठी आपणही काही तरी देणं लागतो या हेतूने सामाजिक संस्थांना भेटी देऊन मदत करण्यास सुरुवात केली आहे आणि विशेष म्हणजे याची सुरुवात माझ्या संस्थे पासून करण्यात आली. संस्थेत आल्यावर यांनी खूप सर्व मुलांच्या बरोबर मस्ती,मजा केली. एकंदरीत यांना संस्थेचे कार्य जवळून पाहण्याची संधी मिळाली.
      तसेच दुसऱ्या एका कार्यक्रमात पुण्यातील माझे आदरणीय मित्र श्री. निलेश साहेब (Income Tax Department, Pune) यांनी त्यांच्या जिवलग मित्रांना एकत्र करून संस्थेच्या भेटीसाठी आणले होते. विशेष म्हणजे हि सर्व तरुण समाज सेवक नेहमी सामाजिक संस्थांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करतात. अशीच मदत या तरुण समाज सेवकांनी माझ्या संस्थेला अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली आहे. मला खरोखरच या सर्वांचे मनापासून आभार मानावे वाटतात.कारण या दोन तरुण ग्रूपमध्ये समाजातील गरजवंताना मदत करण्याची धडपड दिसली.


DATE - 17/12/2021 - NIRANKAR BALGRAM TEAM

Date - 15/11/2019

       आज संस्थेच्या भेटीसाठी VIT College, धनकवडी येथील माझे आदरणीय तरूण समाज सेवक विद्यार्थी आले होते. बाल दिनाच्या निमित्ताने छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे या सर्व विद्यार्थ्यांनी खूप मजा केली. प्रत्येकानी आपले स्वतःचे मनोगत व्यक्त केले. शेवटी मी माझ्या 17 वर्षातील कार्याचे अनुभव त्यांना सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
       तसेच बाल दिनाच्या निमित्ताने EXL , IT Company ,    Magarpatta , Hadapsar येथील तरुण समाज सेवक संस्थेच्या भेटीसाठी आले होते. विशेष म्हणजे या सर्वांचा समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची भावना दिसली. सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. CSR Activitie बाबत चर्चा झाली आणि संस्थेच्या माध्यमातून CSR मध्ये काही तरी प्रोजेक्ट करण्याचे आश्वासन दिले.खूप छान टिम होती.
        VIT College विद्यार्थी आणि EXL Company यांची सर्व टिम संस्थेच्या भेटीसाठी आले होते या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.

Date - 21/01/2022
       नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी खराडी, पुणे. येथील जगातील सर्वात मोठी व्यावसायिक रिअल इस्टेट सेवा नामांकित कंपनी "(Coldwell Banker Richard Ellis, CBRE FACILITIES OPERATION. CREDIT SUISSE, Eon Park,Kharadi, Pune, Maharashtra. यांचे माझे आदरणीय सहकारी मित्र श्री. गितेश कुलकर्णी सर आणि त्यांच्या मॅडम आले होते.
     आम्हाला आनंद झाला की जागतिक पातळीवर काम करणाऱ्या कंपनीचे व्यक्ती माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी येतात. तसेच या ठिकाणी भेटण्यासाठी न येता स्वतः गितेश कुलकर्णी सरांनी त्यांचा वाढदिवस संस्थेच्या सर्व मुलांच्या बरोबर केक कापून साजरा केला. तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना विविध आजारांवर औषध भेट म्हणून दिली. यासाठी आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
     जाताना सरांच्या बरोबर कंपनी आणि निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या बरोबर CSR Activities मध्ये काम करण्याची तयारी दाखवली आहे. मला आनंदाने सांगावे वाटते की माझे आदरणीय सहकारी मित्र डॉ. सुर्यकांत शेळके सर यांचे मोठे योगदान आहे की यांनी माझ्या संस्थेत येऊन मदत केली आहे त्या बद्दल.


Date - 22/05/2021
      आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की सध्या या कोरोणातील वाईट परिस्थितीत समाजातील गरीब व गरजू निराधार स्त्रियांना आणि कुटूंबाना माझी संस्था अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करत आहे. आज सकाळी आलेली एक महिला आणि तिचा छोटा मुलगा हे संस्थेत आल्यावर समोरच त्यांना किराणा माल दिसला तर लगेचच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.हे पाहून मला माझ्या सोशल वर्कर वैशाली मॅडम यांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले होते.या वाईट परिस्थितीत आम्हाला अन्नाची किंमत कळाली आहे.तसेच यातील दुसरी एक महिला गेली तीन वर्षे छातीच्या आजाराने ग्रस्त आहे. डॉक्टरांनी तिला दोन लाख रुपये खर्च सांगितला आहे. तिच्या घरची गरीब परिस्थितीमुळे तिने दवाखान्यात न जाता तिचा आजार अंगावर काढत आहे.
     मला खरोखरच खूप अभिमान आणि आनंद वाटतो की माझी संस्था या वाईट परिस्थितीत गरीबांना मदत करत आहे. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा आहे तो माझ्या संस्थेच्या दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळे. आणि हि सर्व मदत मी माझ्या संस्थेच्या मुलांच्या घासातला घास गरीबांना वाटतोय.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर
(International CSR Award Wining NGO, Pune.)



Date - 10/06/2021
       नमस्कार आज पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीने समाजातील गरीब मजुरांना आणि गरजू लोकांना तसेच कोरोणामुळे नोकरी गेलेल्या कुटुंबाला जवळ पैसे नसल्याने आणि घरात धान्य नाही यामुळे काय खायचे अशा परीस्थितीत अडचणीत असलेल्या कुटुंबांना धान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली.
    आपणांस सांगण्यास दुःख वाटते की आज कुटुंबातील मोठ्या लोकांना एक वेळ उपाशीपोटी राहू शकतात पण त्याच कुटुंबांत लहान बाळ असेल तर त्या बाळाला दुधाची आवश्यकता असते. पण जर त्या बाळाची आई उपाशी राहि्ली तर कसं होणार. म्हणूनच अशा एका कुटुंबाला धान्याच्या स्वरुपात मदत केली. धान्य घेताना त्या लहान बाळाला सुद्धा आनंद झाला होता. आणि दोघां आई वडीलांना आनंद झाला.

       मला खूप आनंद वाटतो की आपण या कोरोणा परीस्थिती मध्ये सर्वांना मनापासून मदत करतोय. पण याचे सर्व श्रेय जाते ते माझ्या समाजातील दानशूर व्यक्तींना.समाज मला मदत करतोय म्हणून मी माझ्या संस्थेच्या मुलांच्या घासातला घास गरीबांना वाटतोय.

Date - 26/10/2020
     नमस्कार काल दसरा निमित्ताने पुण्यातील पाहुणे मंडळी संस्था भेटीसाठी आले होते. विशेष म्हणजे हि पोस्ट टाकण्यामागे मला आनंद झाला की वरील फोटो मधील छोट्या समाज सेवकाने माझ्या संस्थेला केलेली छोटीशी मदत म्हणजे आताच्या कोरोना परिस्थितीत आमच्या साठी लाख मोलाची मदत ठरली आहे.
     त्याच्या वाढ दिवसांच्या निमित्ताने त्याने घरी ताक तयार करून आपल्या चार पाच जवळील मित्रांना बरोबर घेऊन सोसायटी मधील घरांमध्ये जाऊन विकले आणि तो आलेला कष्टाचा पैसा गोळा केला. एकूण - 827/- रूपये जमा झाले होते.सुसंस्कृत घरातील हा समाजसेवक म्हणजे कु. शौर्य राजू याला मी मनापासून सलाम केला आणि त्याच्या आदरणीय आई व वडील आणि दादा यांना पण आम्ही मनापासून सलाम केला.


Date - 27/04/2021
      नमस्कार आज पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीने या कोरोणा मध्ये एका गरीब मातेला अन्नधान्याच्या स्वरूपात तिच्या मागणी नुसार मदत करण्यात आली आहे.
      या माते बद्दल सांगायचे तर ती स्वतः एका मोठ्या आजाराने त्रस्त आहे. तिला कॅन्सर झालेला आहे व तिचे दोन ऑपरेशन झाले आहेत. तिच्या गरीब परिस्थितीमुळे तिचा ऑपरेशन चा सर्व खर्च दवाखान्याने मोफत केला आहे. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तिची मुलगी तिला सांभाळत आहे. आता तिला जास्त काम होत नाही.कसेतरी तिचे आयुष्य चालले आहे. तिचे पती या जगात नाही, यामुळे सर्व संसाराचा गाडा तिच्यावर आहे. सध्या तिची एक मुलगी नोकरी करून आईचा औषधोपचार आणि घरचं भागवत आहे.
     आमचे आदरणीय श्री. आदित्य चरेगावकर सर यांनी तिला माझ्या संस्थेत घेऊन आले. आदित्य सरांच्या मुळे त्या मातेला मदत करू शकलो.
मला आनंद आहे की माझ्या हातून समाजातील गरीब लोकांना या कोरोणा मध्ये अन्नधान्याच्या स्वरूपात मदत होत आहे.


Date - 03/09/2019
    नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी " AMDOCS " कंपनी,मगरपटटा, हडपसर येथील टिम आली होती. संस्थेच्या कार्याची माहिती या सर्वांना दिली आणि संस्थेच्या इतर नवीन सुरू होणा-या प्रोजेक्ट बद्दल चर्चा करण्यात आली. सर्वांनी मनापासून मला व संस्थेला शुभेच्छा दिल्या.
या आलेल्या टिमच वैशिष्ट्य म्हणजे यांच्यातील व्यक्ती ह्या वेगवेगळ्या राज्यातील असून कामासाठी पुण्यात आले आहेत.हे सर्वजण खूप Activ होते. समाजासाठी काही तरी वेगळे करण्याची भावना दिसून आली.
      AMDOCS कंपनीची टिम संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.

Date - 12/04/2020

       नमस्कार आपल्या सर्वांना मनापासून विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बरोबर कुटुंबातील सदस्य आणि समाजातील इतरांची काळजी घ्यावी ही विनंती.
       तसेच जर आपणास शकय असेल तर गरीब व गरजूंना आणि हातावरील पोट असणारया लोकांना अन्न धान्य या स्वरूपात मदत करावी. कारण आता 30 एप्रिल 2020 पर्यंत Lock Down राहणार आहे. याचा फटका सर्व सामान्य माणसाला होणार आहे.

आपला सेवक़ .

Date - 26/09/2019 - BIRTHDAY CELEBRATION


Date - 11/01/2021
   नमस्कार आज खूप वर्षांनी आमचे आदरणीय सर चोरडिया ( SUHANA MASALA - PRAVIN MASALE WALE) हडपसर, पुणे, यांच्या नवीन ऑफीसला भेट देण्याचा योग आला आणि याचे निमंत्रण आमचे आदरणीय गिरीश क्षीरसागर सर यांनी दिल्या मुळे.
      ऑफीसला भेट दिल्यावर क्षीरसागर सरांनी आपले पणाने माझे स्वागत केले. सरांच्या बरोबर संस्थेच्या कार्याचा आढावा घेत असताना मागील दहा वर्षांपूर्वी माझ्या संस्थेला केलेल्या मदतीची आठवण झाली. चोरडिया सरांनी केवळ सकाळ पेपरात आलेल्या माझ्या बातमीला पाहून दर महिन्याला किराणा माल घेण्यासाठी आर्थिक मदत करत होते आणि ती मदत वर्षभर माझ्या संस्थेला केली.अशावेळी मला मदत केली की आम्हाला खरी मदतीची गरज होती, आणि केवळ चोरडिया सर देवा सारखे धावून आले.याबाबत माझी संस्था सरांचे कायमस्वरूपी आभार मानतो. तसेच माझे आदरणीय गिरीश सर यांनी तर माझ्या संस्थेला वेळोवेळी मदतीचा हात दिलेला आहे.
खरोखर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जर आपले काम प्रामाणिक आणि सातत्य असेल तर वेळ प्रसंगी साक्षात परमेश्वर आपल्या पाठिशी उभा राहतो.

Date - 03/11/2019

      नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी आर्मी तील मेजर डॉ. संदिप पायमोडे, सर आणि त्यांचे वडील मिलेटरी रिटायर्ड कॅप्टन तसेच त्यांच्या आई व बहिण आले होते. संस्थेच्या कार्याची माहिती त्यांना समजल्यावर सम्पूर्ण कुटुंबासमवेत भेटायला आले.
    डॉ. संदिप सर हे सध्या " Military Hospital , Amritsar , PANJAB " येथे रुग्णांची सेवा करत आहेत. संदिप सर आणि त्यांचे सर्व कुटुंब सामाजिक भावना जपणारे आहेत हे पाहून खूप छान वाटले. एक विशेष म्हणजे संदिप सर संस्थेत आल्यावर त्यांच्या सोबतच आजारी व्यक्तीला तपासणी करण्याचे साहित्य होते. यामुळे मला स्वतःला आणि एका काकांना तपासणी करण्याची विनंती केली. सरांनी लगेचच तपासणी करून औषध लिहून दिले.
    डॉ. संदिप सर आणि त्यांचे कुटुंबीय संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.

Date - 10/09/2019
        नमस्कार आज संस्थेच्या भेटीला आदरणीय तरुण वर्ग आला होता. संस्थेत आल्यावर या तरुण मान्यवरांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच यांना छान मार्गदर्शन केले.
         खरोखरच मला आताच्या तरुणाईचे खूप कौतुक आणि अभिमान वाटतो.या सर्वांनी आपल्या कामातून वेळ काढून सामाजिकतेची भावना जपली आहे. आणि या सर्वांना आपण पण समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जबाबदारी आपली आहे असं वाटायला लागलं आहे.खरोखरच हे खरे समाजसेवक आहेत.
         संस्थेत तरुणाई आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो
.

Date - 07/09/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 15/08/2019 - BIRTHDAY CELEBRATION

DATE - 14/04/2022 -   BIRTHDAY CELEBRATIONS


Date - 20/03/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील तरुण युवकांचा " FRIENDS" नावाचा एक ग्रुप आला होता. यांनी मला फोन करून संस्थेच्या भेटीसाठी विनंती केली होती. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना परवानगी दिली होती.
या FRIENDS ग्रूपमध्ये तरुण युवकांना त्यांनी सामिल केले आहे. या समविचारी तरुण युवकांनी एकत्र येऊन अनाथ आश्रमातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काहि करता येईल का आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करुन एक मुल शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याला पुढील शिक्षणासाठी मदत करणे हा त्यांचा हेतू आहे. यांनी संस्थेत येऊन सर्व मुलांच्या बरोबर खेळ, गप्पा मारल्या आणि खूप एन्जॉय केला.
आज मला अभिमान वाटतो की आजची तरुण पिढी सामाजिक क्षेत्रात मनापासून कार्य करत आहेत आणि हे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वरील FRIENDS GROUP संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


DATE - 03/11/2021- NEW JARKING GIFT TO ALL CHILDRENS.

Date - 29/07/2019
नमस्कार आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे स्टेशन, पुणे येथे " दिव्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, बुलढाणा यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील 25 दिग्गजांचा " दिव्य रत्न जीवण गौरव " पुरस्काराने गौरविण्यात आले होते.या पुरस्कारासाठी मला आमंत्रित करुन गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री विजेते मा.डॉ.विजयकुमार शहा आणि एड्स ग्रस्त मुला मुलींचे आई आणि बाबा आदरणीय दत्ताकाका बारगाजे आणि आदरणीय संध्यामाई बारगाजे तसेच महाराष्ट्रातील दिग्गज समाजसेवक , चित्रपट कलाकार, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.हा सोहळा खरोखरच खूप भव्य दिव्य झाला.
माझे आदरणीय अशोक काकडे सर ( संस्थापक अध्यक्ष दिव्या फाउंडेशन महा. राज्य बुलढाणा.) यांचे आणि आदरणीय सहकारी आणि या सोहळ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार्या व्यक्तीचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 12/09/2021
    नमस्कार सर्वांना गणपती बाप्पांच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि एम.ए. रंगूणवाला डेंटल कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे. येथील डॉक्टरांची टीम आली होती. संस्थेच्या कार्याची त्यांना आँनलाईन माहिती मिळाली म्हणून त्यांनी मला संस्थेच्या भेटीसाठी फोनवर विनंती केली होती.
     आजचा दिवस ठरवून त्यांना संस्थेच्या भेटीसाठी निमंत्रण दिले होते. येताना सर्व डाॅक्टर तयारीत आले होते. त्यांनी संस्थेच्या सर्व मुलांच्या दातांची तपासणी केली आणि दातांची कशी काळजी घ्यावी ह्या बद्दल मार्गदर्शन केले.तसेच भविष्यात मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्वासन दिले.
   सर्व डॉक्टर्स मंडळी संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


DATE - 10/04/2022 -   CELEBRATIONS

Date - 02/02/2020

         नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी महादेव नगर, मांजरी,पुणे.येथील " QUINCE ( MARKET INSIGHTS ) या कंपनीचे पदाधिकारी आले होते.
यांनी येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कंपनीला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून CSR ACTIVITIES मध्ये संस्थेला मदत करणे यासाठी. संस्थेत आल्यावर त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. तसेच या सर्वांना मार्गदर्शन केले.या सर्वांना संस्थेत खूप छान वाटले आणि भविष्यात मदत करणार आहेत.

         जाताना त्यांनी त्यांच्या नवीन सुरू केलेल्या कंपनी बाबत माहिती दिली आणि वर्ष पूर्ण झाले म्हणून समाजासाठी काहीतरी करावे म्हणून त्यांनी संस्थेला मदत केली.
QUINCE कंपनीचे पदाधिकारी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 16/02/2021
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील आदरणीय व्यक्ती आले होते. यामध्ये आदरणीय श्री. विठ्ठल गायकवाड साहेब ( अध्यक्ष - महामाता रमामाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, पुणे.) आणि पुज्य भनते हर्षवर्धन तसेच आदरणीय आदित्य यात्री ,सर (Ph.D Scholar) हे आले होते.
    या आदरणीय मान्यवरांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.तसेच त्यांना माझ्या गेली अठरा वर्षे सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल मार्गदर्शन केले.
आदरणीय पाहुणे मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 05/09/2021
     नमस्कार आज माझ्या संस्थेच्या वतीने समाजातील सर्व आदरणीय शिक्षकांना आणि माझ्या पाठिशी सदैव देवा समान उभे असणारे माझे आदरणीय मोठ्या व्यक्तींना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुण्यातील नामवंत काॅलेज मधून शिकून मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या तरूण विद्यार्थ्यांनी ( समाज सेवक) माझ्या संस्थेला भेट दिली. या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील तरुण मंडळी कोण CA, Architecture, Tax Consultant, Shar Market, Construction. अशा क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच या सर्वांना खूप छान वाटले संस्थेचे कार्य जवळून पाहिले म्हणून.
   तसेच कोरोना मध्ये माझ्या संस्थेच्या वतीने गरीब लोकांना आणि अनाथ निराधार मुलांना तसेच गरजू कुटूंबाना धान्याच्या स्वरुपात मदत केली होती, याची दखल घेऊन मुंबईतील एका जुन्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि सोबत काम करण्यासाठी निमंत्रण दिले. आज सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते की माझ्या संस्थेच्या वतीने समाजातील गरजूंना जी काही मदत होत आहे यांचे सर्व श्रेय माझ्या संस्थेच्या आदरणीय व्यक्तींना जाते.



Date - 09/06/2020
      आज रोजी मला कोरोना महामारीच्या संकटात उपाशी पोटी राहणाऱ्या गरीब , विधवा महिला तसेच हातावरच पोट असणाऱ्या कुटुंबांना स्वतःच्या अन्न धान्यातील घासतला घास 20 गरीब कुटुंबांना धान्याचे किट बनवून वाटले या मदतीची दखल भारत सरकारच्या ( Rural Urban Council of Skills & Vocational Studies , NCT of Dilhi) Awareness Program of COVID - 19 (WORLD HEAlTH ORGANIZATION (WHO.)यांनी घेऊन वरील प्रमाणपत्र मला मेलवर पाठवून दिले . याबद्दल मी वरील भारत सरकारच्या संस्थेचा आभारी आहे .

आपला सेवक.
केशव धेंडे, सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महम्मद वाडी, हडपसर, पुणे.
(International CSR Award Winning NGO - Pune, 2019 & 2020)
Mob. No. 9561816451.


DATE - 31-03-2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 21/12/2021


       नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या वतीने आजही या कोरोना मध्ये गोर गरीब आणि लहान मुलांना शैक्षणिक, मेडिकल, आणि अन्नधान्य या स्वरुपात मदत केली जात आहे.
      खरोखरच अजूनही समाजात लोकांना काम धंदा नसल्याने पैशांची गरज भासत आहे. या कारणांमुळे एक वेळा जेवायला मिळेल की नाही अशा विचारांनी त्यांचा दिवस चालला आहे. मला अभिमान वाटतो की अशा वाईट परीस्थिती मध्ये माझी संस्था त्यांच्या वेळेला आणि पाठिशी ठामपणे उभी आहे आणि हाच या गरीबांचा आशिर्वाद आमच्या संस्थेच्या पाठिशी आहे. तसेच तुम्हाला आवर्जुन सांगावे वाटते गरीबांना माझी संस्था जरी मदत करत असली तरी यामागे मला मदत करणारे खरे शिल्पकार समाजातील माझे आदरणीय मित्र मंडळी, थोर देणगीदार तसेच आदरणीय माझे तरुण युवक व युवती या सर्वांचा मोठा सहभाग आहे. म्हणून मला मदत करण्यासाठी ताकद मिळते.
    म्हणून मी व माझी संस्था या सर्वांचे मनापासून आभार मानते.


          Date - 21/05/2019 To 24/05/2019 या दिवसांमध्ये ओरीसा, छत्तीसगढ या ठिकाणी " संकल्प " या संस्थेत विशेष निमंत्रित केले होते. मला या ठिकाणी या संस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते.हि संस्था आदिवासी आणि नक्षलवादी या क्षेत्रात कार्यरत आहे.या संस्थेला भेटीसाठी सर्व खर्च याच संस्थेने केला मला काहीच वैयक्तिक खर्च करावा लागला नाही.
          विशेष म्हणजे संकल्प हि गेली वीस वर्षे आदिवासी भागातील मागासवर्गीय समाजातील महिला आणि पुरुष यांचे जीवन मान सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत.तसेच या गावातील बरीच गरीब महिला पुरुष सहा महिन्यांसाठी कामानिमित्ताने स्थलांतर करत असतात.आणि अशा लोकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हि संस्था विशेष प्रयत्न गेली वीस वर्षे करत आहेत.या दोन दिवसांत स्थानिक पातळीवरील प्रकल्प भेटी झाल्या.विशेष म्हणजे स्थानिक महिलांचा या संस्थेला खूप मोठा सपोर्ट आहे.
     शेवटच्या दिवशी स्थानिक प्रेक्षणीय स्थळे बघितले.आणि एका अनाथाश्रमाला भेट दिली.खरोखरच " संकल्प " संस्थेच्या भेटीचा आयुष्य भर लक्षात राहणार आहे.या संस्थेने मला व माझे सहकारी वैशाली मॅडम ( BSW - MSW ) संस्था भेटीसाठी बोलावल त्या बद्दल संस्थेचे संस्थापक श्री.सदानन मेहेर सर आणि त्यांचे सहकारी यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 15/01/2021
         नमस्कार आज माझा मुलगा कु. चैतन्य होमकर यांच्या वाढ दिवसांच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर एक फोटो. विशेष सांगायचे म्हणजे हा जेव्हा माझ्या संस्थेत आला होता तेव्हा त्याचे वय सहा वर्षे होते. त्याला लहानपणी योग्य मार्गदर्शन मिळाले म्हणून आज तो बारावी सायन्स मध्ये शिकत असून नोकरी करत आहे. आज मला अभिमान वाटतो की एका मुलाला सांभाळून मोठे केले आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे केले.
      उद्या मी या जगात नसेल तर तो आयुष्यभर माझे नाव स्मरणात ठेवेल. आणि मग तो स्वतः इतरांना मदत करेल.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर(BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, हडपसर, पुणे.(International CSR Award Wining NGO - Feb. 2019 & Feb - 2020 & American Merit Council Appreciate Award - 21/11/2021)


DATE - 22/10/2021 MEDICAL DENTAL CAMP

Date - 16/07/2019
      नमस्कार सर्व प्रथम समाजातील माझे आदरणीय आणि वडिलधारी व्यक्तींना मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
     आजच्या या पावन दिनी म्हणजेच गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने मला आपणांस सांगण्यास आनंद होतो आहे की माझ्या संस्थेतील माझा मुलगा कु. प्रणव संजय होमकर याला इयत्ता - 4 थी पासून त्याचे आई-वडील या नात्याने पालनपोषण करुन त्याचे 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सरकारी ITI ला प्रवेश मिळवून दिला होता आणि आज तो दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मी त्याला व त्याच्या इतर भावंडांना सांभाळताना मला खूप अडचणींना सामोरे जावे लागले आणि मला जाणून बुजून खूप त्रास देण्यात आला होता.पण या सर्व गोष्टींचा विचार न करता मी माझं कार्य पुढे चालू ठेवले. आणि आज याचेच प्रतिक माझा मुलगा कु.प्रणव होमकर आहे. पुढच्या वर्षी तो ITI च शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागेल.आणि स्वतः कमवून त्याच्या वयोवृद्ध वडीलांना सांभाळेल.
      मला खरोखरच आजच्या या दिवशी खूप आनंद होतो आहे. उद्या जर मी या जगात नसेल तर प्रणव हा आयुष्यभर मला आशिर्वाद देईल कारण मी एका गरीब व गरजू मुलाला समाजात ताठ मानेने उभे राहण्यास शिकविले यातच मोठं समाधान.

Date - 24/04/2021
नमस्कार, आजच्या या कोरोणा मध्ये आणि लाॅकडाऊन परीस्थितीत समाजातील सर्व सामान्य गरीब मजुरांना, कुटुंबांना आणि इतरांना खरोखरच खूप वाईट परिस्थितीला झुंज देण्यासाठी झगडत रहावे लागत आहे. हे पाहून मनाला खूप वेदना होत आहेत.कारण सध्याची परिस्थितीच तशी झाली आहे.
काल मला What's up ला एका अनोळखी नंबर वरून मदतीचे मेसेज आले होते. मी ते मेसेज वाचले आणि खूप वाईट वाटले. या मेसेज मध्ये त्यांनी मला मदत करण्यासाठी विनंती केली होती. हे स्थलांतरीत लेबर वर्कर्स होते. त्यांना तीन दिवस स्वतः चे पोट भरण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. जवळच असलेल्या शासनाच्या शिवभोजन जेवणाचे एकवेळ चे जेवण करून दिवस घालवत होते. माझा नंबर त्यांना कोणीतरी दिला होता आणि त्यांना आश्वासन दिले होते की केशव धेंडे,सर नक्कीच तुम्हाला मदत करतील.
मला वरील सर्व माहिती समजल्यानंतर लगेचच आज त्यांना संस्थेत बोलवून एक महिना पुरेल इतके किराणा सामान दिले. संस्थेत हे लेबर आल्यावर प्रथम बसविले आणि मग चहा पाणी देत त्यांना मानसिक आधार दिला. मी फोन करून रिक्षा बोलवून लेबर आणि किराणा सामान तसेच त्यांचे रिक्षा भाडे देवून त्यांना परत आनंदाने घरी पाठवले. मी मनापासून सांगतो की त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव पाहून खूप छान वाटले. पण या मदतीबद्दल मी माझ्या समाजाचे आणि माझे आदरणीय देणगीदार यांचे मनापासून आभार मानतो. कारण ते मला मदत करतात म्हणून मी गरजवंताना मदत करु शकतो आहे. माझ्या संस्थेच्या वतीने या कोरोणा काळात सलग दुसऱ्यांदा गरीब मजुरांना व वृद्धाश्रम यांना मदत करता आली आहे याचे मला खूप मोठे समाधान वाटले आहे.

DATE - 22/07/2019 -  UPS COMPANY CSR ACTIVITY 

Date - 10/05/2020

         नमस्कार आज माझा संस्थेला बरोबर 17 वर्षे पूर्ण झालेली आहेत.( 2003 To 2020) आणि हि सतरा वर्षे कशी निघून गेली ते कळालेच नाही.पण एक मात्र या क्षेत्रात कार्यरत असताना माझा शैक्षणिक सरकारी जाॅब मी सोडून दिला या बद्दल मनात अजिबात दुःख झाले नाही. कारण मी या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतो तर याच क्षेत्रात नाव झाले असते या कारणास्तव मला माझा शैक्षणिक सरकारी जाॅब पेक्षा आज मी सध्या करत असलेल्या सामाजिक क्षेत्रात सर्व जगभर नाव कमावले या बद्दल मला मोठा अभिमान आहे.पण एक मात्र मागे वळून पहात असताना असे लक्षात आले की हा 17 वर्षांचा सामाजिक क्षेत्रातील खडतर प्रवास म्हणावा तसा सहज गेलेला नाही कारण या क्षेत्रात कार्य करत असताना खूप चांगले वाईट अनुभव पहायला मिळाले पण मागील चांगला वाईट अनुभव बरोबर घेऊन न डगमगता पुढे चालत आलो आहे.या माझ्या सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना सर्व प्रथम मला 2013 मध्ये अनाथ मुलांसाठी करत असलेल्या कार्यासाठी महाराष्ट्रातून पहिला पुरस्कार मिळाला.तो क्षण माझ्या सारख्या छोट्या समाज सेवकाला मोठा सन्मान देऊन गेला. आणि मग मी यानंतर मागे वळून पाहिले च नाही.
       सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना मला व माझ्या संस्थेला " International CSR Award - 2019 & 2020 हे दोन जागतिक स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. याच बरोबर स्थानिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप पुरस्कार मिळाले.तसेच " International CSR Company " यांनी माझ्या संस्थेला Funding केले आहे.
       आज मी आणि माझी संस्था जी कार्य करत आहे यात माझ्या कार्यावर विश्वास ठेवून समाजातील लहान थोर आदरणीय व्यक्ती यांच्या मदतीचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्या संस्थेच्या कर्मचारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य यांचा मोठा आधार आहे.या मुळे मी स्वतः या सर्वांचा मनापासून आभार मानतो.

DATE - 26/07/2020 BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS


Date - 15/11/2020
       नमस्कार, पुन्हा एकदा सर्व आदरणीय व्यक्ती यांना मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज विशेष लिहावे आणि सांगावे वाटते की दिवाळी निमित्ताने संस्थेच्या भेटीला पुण्यातील एका संस्थेच्या अध्यक्षा आणि पदाधिकारी आले होते.संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी व संस्थेचे कार्य जवळून पाहण्यासाठी आले होते.
    आमचे आदरणीय मित्र व समाजसेवक मा.श्री.मनोज श्रीधरन यांनी या पाहुणे मंडळींना संस्थेत घेऊन आले होते.विशेष म्हणजे यातील दोन लेडीज अंध समाज सेवीका संस्थेच्या पदाधिकारी होते.या दोघींना अजिबात दिसत नव्हते.यांच्या बाबतीत सांगायचे तर यांनी लहानपणापासून खूप संघर्ष करत जीवन जगले आहे आणि त्याचे भांडवल न करता समाजाची सेवा करावी म्हणून स्वत: ची संस्था स्थापन करून या माध्यमातून इतर गरजूंना मदत करत आहेत. जाताना माझ्या संस्थेला छोटीशी पण मोठ्या मनापासून आर्थिक मदत केली.
      दिवाळी निमित्ताने माझ्या संस्थेला मदत आणि भेट दिली आहे या बद्दल आम्ही सर्व जण या सर्वांचे मनापासून आभार मानतो.


Date - 19/02/2020

       नमस्कार आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने काल दिनांक - 18/02/2020 रोजी " TAJ Lands Hotel, Bandra, Mumbai. या ठिकाणी संस्थेला सलग दुसऱ्यांदा 2nd International CSR Award - 2020 - For Development And Welfare of Women and Children " यासाठी मिळाला आहे.
    हा Global CSR Award होता.आणि या पुरस्काराचे स्वरूप होते जगातील 500 Top CSR Company आणि भारतातील 101 NGO यांना ज्युरी यांनी निवडून त्या त्या क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात आला आहे. या ठिकाणी जागतिक कंपन्यांनी केलेल्या कार्याची ओळख झाली आणि आम्हाला भाग्य मिळाले यांच्या बरोबर बसण्याचे आणि पुरस्कार मिळाल्याचे. आपण पण CSR कंपनी बरोबर काम करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
हा पुरस्कार आपल्या भारतीय फिल्म अँक्टर Miss. Sinnha Chohan. यांच्या हस्ते देण्यात आला. ( 6 Filmfare awards Winning Actres )
       आज मला खरोखरच खूप आनंद आणि अभिमान वाटतो की हे सर्व शक्य झाले आहे ते केवळ तुम्हा सर्वांचे आशिर्वादाने. असेच आपल्या सर्वांचे सहकार्य शेवट पर्यंत मिळावे हि विनंती.

Keshav Dhende , Sir
Founder Director - Nirankar Shikshan Prasarak Mandal .
( INTERNATIONAL CSR GLOBAL AWARD WINNING NGO - 2019 - 2020 & 2020 - 2021 )
Mobile No - 9561816451


Date - 26/12/2021
नमस्कार संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील "Rotary Club Humanitas, Pune." हि नामांकित संस्था आली होती. ख्रिसमस नाताळ निमित्ताने संस्थेच्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आणि या सर्व मुलांना नाताळाच्या निमित्ताने भेट वस्तू देण्यासाठी आले होते.या संस्थेचे सर्व तरुण युवकांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन नाताळाचा कार्यक्रम सर्व मुलांच्या बरोबर मोठ्या उत्साहाने साजरा केला. या सर्व तरुण युवकांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
तसेच मगरपटटा, हडपसर, पुणे येथील "DENTSU WORLD SERVICES" International Company. हि कंपनी संस्थेच्या भेटीसाठी आली होती. या कंपनीने नाताळच्या निमित्ताने संस्थेच्या बरोबर CSR ACTIVITIES मध्ये माझ्या संस्थेला Computers भेट आणि इतर संस्थेच्या उपयोगी पडतील अशा वस्तू डोनेशन मध्ये देण्यात आले आहेत. समाजात आपण कुठेतरी चांगले कार्य केले तर नक्कीच आपण केलेल्या कार्याची पावती आपल्याला मिळते हे मात्र नक्की. तसेच यासाठी मी नेहमीच माझ्या या पोस्ट मध्ये समाजातील आदरणीय देणगीदार यांचा मी नेहमीच उल्लेख करत असतो. कारण त्यांच्या या सहकार्या शिवाय मी काहिच करु शकत नाही. म्हणून मी वरील सर्वांचे मनापासून आभार मानतो.


Date - 07/04/2019

        नमस्कार काल वडगावशेरी येथील श्री भैरवनाथ प्रतिष्ठान या मंडळाच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. विशेष म्हणजे या मंडळाचा मागच्या वर्षीचा पुरस्कार मला मिळालेला होता.
        कालच्या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 समाज सेवकांना गौरविण्यात आले होते. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या हातून सुवर्ण पदक विजेत्या कन्येच्या माता पित्याचा " आदर्श माता पिता " हा पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार देताना मला मनात खूप गहिवरून आले होते.कारण त्यांना पुरस्कार देण्या इतपत मी मोठा व्यक्ती नाही.
      श्री भैरवनाथ प्रतिष्ठान या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री.अक्षय गलांडे साहेब आणि इतर आदरणीय सर्व सदस्य मित्रांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो.आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा.

Date - 30/05/2020

     नमस्कार आज आम्हाला आनंद वाटतो की सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेत आहेत. आणि खरोखरच सामाजिक कार्य करत असताना नि स्वार्थी मनाने केले कार्य हे मनाला खूप काही समाधान आणि आनंद देऊन जातो.
       विशेष म्हणजे कोरोना च्या वाईट परिस्थिती मध्ये आम्ही आमच्या परीने गरीब व गरजू लोकांना संस्थेच्या माध्यमातून अन्न धान्याची किट तयार करून वाटले. तस पहायला गेले तर मला वाटते की तळागाळातील लोकांना खूप मदत करावी पण मला लिमिट असल्याने ईच्छाशक्ती असताना सुद्धा काहीही करता येत नाही. आमच्या कार्याची दखल घेऊन " श्री भैरवनाथ प्रतिष्ठान वडगाव शेरी, पुणे. या मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य या़ंचे आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो.

आपला सेवक,
केशव धेंडे, सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ,
महम्मद वाडी, हडपसर, पुणे.
(International CSR award winning NGO, Pune. 2019 & 2020)

Date - 23/06/2021
      नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील तरुण कार्यकर्ते आले होते. सध्या कोवीड ची परीस्थिती चालू आहे आणि या वाईट परिस्थितीत सर्व संस्थांना सध्या सर्वांनी मिळून मदत करण्याची वेळ आली आहे.विशेष म्हणजे मुलांना सांभाळणारया संस्थांना अन्नधान्याच्या स्वरूपात आणि इतर मदत मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहे.
      अशाच प्रकारे सध्या समाजातील तरुण समाज सेवक चांगले काम करणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत.तसेच माझ्या संस्थेला भेट देण्यासाठी आधी मला फोन वर विनंती केली होती. तसं मी सर्वांना फोन करून यावं अशी विनंती केली आहे. हे सर्व तरुण समाज सेवक संस्थेत आल्यावर त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.या सर्वांना संस्थेत आल्यावर खूप छान वाटले. संस्थेला कशा प्रकारे मदत करता येईल यावरही चर्चा झाली.मला खूप आनंद वाटतो की तरुण समाज सेवक सध्या सोशल कामामध्ये स्वताला झोकून द्यायला लागले आहेत.खरोखरच मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.



Date - 26/08/2020
       नमस्कार आज संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यातील तरूण मंडळी आली होती.विशेष म्हणजे संस्थेत येण्याचे कारण म्हणजे या तरूण मंडळातील एका मित्राचा वाढ दिवस होता आणि तो साजरा करण्यासाठी या सर्वांनी मिळून ठरविले की बाहेर पार्टीत पैसे खर्च करण्यापेक्षा समाजातील गरजवंताना मदत केली तर या कोरोना मध्ये आपल्या हातून चांगले कार्य होईल.आणि यामुळे सर्व मित्रांना आशिर्वाद मिळतील.
     आजच्या या वाईट परिस्थितीतून सर्व जण बाहेर पडायला पहात आहे आणि आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून यांच्या मित्राने धान्य स्वरूपात संस्थेला मदत केली.खरोखरच आम्ही सर्व जण या सर्व तरूण समाजसेवकांचे मनापासून आभार मानतो.

Date - 15/04/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील नामांकित काॅलेजचे तरुण युवक आले होते. Vishwakarma Institute of Technology (VIIT,Pune) Vishwakarma University (Kondhwa,Pune) And Singhagad Institute of Technology (Kondhwa,Pune) या काॅलेज मधील विद्यार्थ्यांनी माझ्या संस्थेचे कार्य ऑनलाईन पाहिले होते. म्हणून त्यांनी मला संस्थेच्या भेटीसाठी विनंती केली होती. संस्थेत आल्यावर त्यांनी सर्व मुलांच्या बरोबर खूप मजा केली. नंतर या सर्व तरुण युवकांना माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांना सामाजिक क्षेत्रा बद्दल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या कार्यक्रमात माझे आदरणीय मित्र श्री. हरी सावंत सर, साडे सतरा नळी, हडपसर, पुणे यांनी मला एका गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी विनंती केली होती.या व्यक्तीला लाईटचे काम करताना शिडी घसरून खाली पडले होते यामुळे त्यांच्या कमरेला आणि पायाला अपघात झाला होता. आता त्यांना जड काम होत नाही. घरात कमावणारे एकटेच असल्याने खाण्याचे हाल झाले होते. म्हणून मग मी सरांच्या विनंतीला मान देऊन त्या व्यक्तीला संस्थेच्या वतीने अन्नधान्य धान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली. मला आनंद वाटतो की माझ्या संस्थेच्या वतीने खरोखरच गरजूंना वेळोवेळी मदत करू शकतो या बद्दल. पण यांचे सर्व श्रेय मला मदत करणार्या दानशूर व्यक्तींना जाते.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)


Date - 23/09/2019

नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी सकाळी तरुण वर्ग आला होता. येण्या मागचं कारण म्हणजे मिस. प्रतिक्षा कुंभारकर यांचा वाढदिवस होता. प्रतिक्षा मॅडमानी त्यांचे वडील आणि मित्रांना आमंत्रण दिले होते.
या वाढ दिवसासाठी प्रतिक्षा मॅडमानी साधेपणाने आणि बाहेर मित्र मैत्रिणी बरोबर जादाचा वायफळ खर्च न करता पैशांची बचत करत संस्थेमध्ये साजरा केला.तसेच सर्व मुलांना वाढ दिवसाच्या निमित्ताने एक एक टि शर्ट भेट देण्यात आला.
प्रतिक्षा मॅडम यांनी त्यांचा वाढ दिवस संस्थेत साजरा केला त्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून त्यांचे आभार मानतो.

Date - 25/09/2021
      नमस्कार आज आपणांस मनापासून कळविण्यात आनंद वाटतो की गरीब व अनाथ असलेल्या आई वडीलांच्या मुलीला शिक्षणासाठी माझ्या संस्थेच्या वतीने मदत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुलीचे आई-वडील हे पुर्वी स्वतः अनाथ आश्रमात राहून लहानाचे मोठे झाले आहेत.हे दोघेही कष्ट करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. कारण या दोघांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. म्हणूनच मुलीला बारावी नंतर चागले शिक्षण मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. तसेच त्यांची मुलगी आता MPSC परीक्षेची तयारी करत आहे. या कारणांमुळे मी शिक्षणासाठी मदत केली आहे. आणि याचे सर्व श्रेय जाते ते फक्त मला मदत करणार्या आदरणीय व्यक्तींना.
   तसं पाहिलं गेलं तर आजच्या या परीस्थितीत आपण एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. आणि मला पण समाजाकडून मदत मिळते म्हणून मी समाजातील गरीब व गरजू कुटुंबाना तसेच शैक्षणिकदृष्ट्या मदत हवी असणार्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतो.



Date - 22/12/2020
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील एक संस्था " SHARVA FOUNDATION, PUNE " आली होती. येण्यामागचे कारण म्हणजे यांनी माझ्या संस्थेचे काम ऑनलाईन पाहिले आणि मला संस्था पहाण्यासाठी येऊ का म्हणून विचारले, मी लगेचच त्यांना माझी संस्था पहायला निमंत्रण दिले.
संस्थेला भेट देण्यासाठी येण्याचे कारण म्हणजे आता ख्रिसमस सण आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक छान कार्यक्रम घेतला.या तरुण मंडळींनी खूप आनंद घेतला आणि जाताना सर्व मुलांना ख्रिसमस भेट दिल्या.
माझ्या संस्थेला भेट देण्यासाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण " SHARVA FOUNDATION, PUNE. " या संस्थेचे मनापासून आभार मानतो.

Date - 19/02/2021
नमस्कार आज शिव जयंती निमित्ताने सामाजिक क्षेत्रात कोरोणा मध्ये कार्य केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यासाठी (राष्ट्रीय) विश्वगामी पत्रकार संघ, पुणे. या संघटनेने पुढाकार घेऊन पुरस्काराचे आयोजन केले होते. यासाठी या संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सुजाता ताई गुरव यांनी आणि पुणे शहर अध्यक्ष - आदरणीय श्री. मनेश घुले पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याठिकाणी मला पुरस्काराने गौरविण्यात आले. आणि हा पुरस्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर या संस्थेचे लाईफ मेंबर आदरणीय श्री. प्रकाश टेके सर यांच्या हस्ते मिळाला. तसेच या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून रेडिओ मिरची चे जाॅकी आदरणीय केदार जोशी यांना आमंत्रित केले होते.


Date - 01/09/2021
     नमस्कार आज पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने गरजवंत कुटुंबाला धान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली आहे. तसं खूप वाईट वाटते की कोरोना मुळे खूप लोकांना आपली स्वतःची नोकरी सोडावी लागली आहे तसेच या नोकरी मुळं संसार कसा चालवायचा आणि त्यात घरात लहान मूल असेल तर अजून खूपच वाईट परीस्थिती निर्माण होते. कारण आपण मोठे एकवेळ खाऊ पण लहान मुलांना तर सतत खायला लागते.
    माझ्या संस्थेच्या वतीने मदत केल्याला व्यक्तीची नोकरी गेली त्या मुळे त्यांना भाडे भरायचे की घरात किराणा सामान आणायचं या काळजीत असताना त्यांनी मला फोन करुन विनंती केली की सर माझ्या कुटुंबाला धान्याच्या स्वरुपात मदत होईल का? मग लगेचच त्यांना फोनवर या म्हणून सांगितले. त्यांना मदत करताना त्यांच्या चेहऱ्यावर आणि लहान मुलाच्या चेह-यावर जो समाधानाचा आनंद दिसला तो आमच्या साठी खूप मोठा आहे. आणि या समाधानाचे श्रेय जाते ते आमच्या संस्थेच्या देवासारखे समान देणगीदार यांना. माझ्या बरोबर त्यांना सुद्धा हा अनपेक्षित गरीबांचा आशिर्वाद मिळत आहे.


Date - 04/03/2022
       नमस्कार दरवर्षी प्रमाणे याही वेळी परत एकदा निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या माझ्या संस्थेला " WORLD CSR DAY " International CSR Appreciate Certificate मध्ये सलग तिसऱ्या वर्षी सन्मानित करण्यात आले आहे.सन - Feb - 2019 & Feb - 2020 & Feb - 2022. आणि हा कार्यक्रम दिनांक - 18/02/2022 रोजी ऑनलाईन कार्यक्रमा मध्ये संस्थेचे नाव जाहीर करुन सम्पूर्ण जगातून ठराविक NGO, यांना त्यांनी केलेल्या सामाजिक भरीव कामगिरी बद्दल हा सत्कार करण्यात आला आहे.
     आम्हाला खरोखरच खूप अभिमान वाटतो की आम्ही सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आलो आहे आणि खरया अर्थाने मी केलेल्या प्रामाणिक समाज कार्याला आणि समाजातील गरजूंना वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे तसेच त्यांच्या आशिर्वादाने हे सर्व शक्य झाले आहे.याचे सर्व श्रेय जाते ते माझ्या समाजातील सर्व लहान थोर व्यक्तींना आणि माझे आदरणीय देणगीदार या सर्वांना.
      मी याबद्दल मनापासून सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आपला सेवक
केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे.(International CSR Award Wining NGO, Pune - Feb - 2019 & Feb - 2020 & American Merit Council Appreciate Certificate - Date - 21/11/2021 & Feb - 2022 - CSR CERTIFICATE)

Date - 26/01/2022
   नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील नामांकित काॅलेजमधील समाजसेवक आले होते. आज आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्थेतील सर्व मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या परीने संस्थेच्या मुलांना मदत करण्यासाठी.
विशेष म्हणजे पुण्यातील नामांकित काॅलेज "Simboysis Institute of Management Studies For the Event"Veeratvam" Team Pranay. हे विद्यार्थी खडकी येथील संस्थेतून आले होते. आणि याठिकाणी उच्च शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे आर्मी ऑफिसर यांची मुले आहेत. त्यांचे पालक देशाची सेवा करत असताना त्यांच्या मुलांना सामाजिक कामाची आवड निर्माण व्हावी म्हणून असे कार्यक्रम काॅलेज तर्फे घेतले जातात.
    दुसऱ्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असलेली संस्था "Byjus" यामध्ये इतर मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून शिकविणारे शिक्षक (समाजसेवक) हे आले होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने मुलांना मदत केली. तसेच तिसऱ्या कार्यक्रमात पुण्यातील काॅलेजमधील सर्व विद्यार्थी त्यांच्या आवडत्या मैत्रीणीचा वाढ दिवस सर्व मुलांच्या बरोबर केक कापून साजरा केला.
     आपणांस आनंदाने सांगावे वाटते की आजची तरुण पिढी म्हणजेच माझ्या भाषेत "तरुण समाजसेवक" यांना समाजासाठी काहितरी केले पाहिजे याची जाणीव झाली आहे.आणि यांचे अनुकरण इतर तरुण युवकांना आपले आप प्रेरीत करत आहे. या सर्वांना माझ्या संस्थेच्या वतीने मनापासून शुभेच्छा आणि आभार.

Date - 11/08/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 26/01/2021
     नमस्कार आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यातील " स्व.एस.एस.धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट,माॅडेल काॅलणी, पुणे. या संस्थेचे पदास्व.एस.एसधिकारी आणि इतर कार्यकर्ते संस्थेच्या भेटीसाठी आले होते.
      या सर्वांना माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. नंतर या सर्वांनी संस्थेच्या सर्व मुलांच्या बरोबर खेळ, गप्पा आणि गानी गाऊन मजा केली. फाउंडेशनच्या वतीने आज संस्थेला एक वेळचे जेवण देण्यात आले.जाताना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. विक्रांत संजय धोत्रे यांनी त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली.विशेष म्हणजे यांच्या बरोबर तरुण पिढी समाजसेवेत काम करीत आहे हे पाहून खूप आनंद झाला.तसेच आमचे आदरणीय मित्र Adv. Faiyaz K. Shaikh, ( Director - Pune District Lawyer's Consumer Co.Op Soc.Ltd ) हे पण संस्था भेटीसाठी आले होते.
   स्व.एस.एस.धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो.

Date - 16/06/2019 - BIRTHDAY CELIBRATION


Date - 12/11/2020
       नमस्कार दिपावली च्या निमित्ताने माझ्या संस्थेच्या वतीने आणि कुटुंबाकडून समाजातील सर्व आदरणीय लहान थोर व्यक्तींना हार्दिक शुभेच्छा.
          आज दिपावली च्या निमित्ताने साडे सतरा नळी, माळवाडी येथील " आम्ही मैत्रीणी ग्रुप " कुमार पिकासो सोसायटी, हडपसर, पुणे - 28.या सोसायटीच्या महिलांनी काही रक्कम काढली आणि माझ्या संस्थेला किराणा माल भेट म्हणून दिला. विशेष म्हणजे या मदती मागे खरे समाज सेवक माझे आदरणीय मित्र आणि उद्योजक मा.श्री.शेखर पोटे साहेब यांच्या सांगितले प्रमाणे त्यांच्या मिसेस यांनी " आम्ही मैत्रीणी ग्रुपला " कळविले आणि मग या सर्व समाज सेविकांनी पैसे जमा करून मला मदत केली.
माझ्या संस्थेला दिपावलीच्या निमित्ताने मदत केली आहे या बद्दल आम्ही सर्व जण यांचे मनापासून आभार मानतो.आणि मा.शेखर पोटे साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो.


Date - 26/03/2021
      नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी MIT College, लोणी काळभोर, जिल्हा, पुणे. येथील काॅलेजचे विद्यार्थी आले होते. येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या तील एका विद्यार्थ्याचा वाढ दिवस होता. या ठिकाणी आल्यावर त्यांनी प्रथम मित्राचा वाढ दिवस सर्व मुलांच्या बरोबर साजरा केला.
      तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर गप्पा मारत असताना त्यांनी सांगितले की आम्ही आता " Smile Social Foundation,Pune " या नावाची संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो. आणि माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती कळाल्यावर त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी मला विनंती केली.
   MIT College,Pune. या काॅलेजचे विद्यार्थी संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.




Date -17/06/2021
       नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की कोरोणा मध्ये पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीने गरीब विधवा महिलांना धान्याचे किट देण्यात आले. यांना मदत करण्यामागे कारण की ह्या महिलांना घरात खाण्यासाठी धान्य शिल्लक नव्हते. त्यांना मदत केल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला समाधान मिळवून गेले आहे.
       तसेच जेजुरी जवळील साकुरडे गाव, सिद्धार्थ नगर, पुरंदर तालुका,जि.पुणे. येथे माझ्या संस्थेच्या वतीने धान्याचे किट वाटण्यासाठी माझे आदरणीय सहकारी मित्र श्री. विलास लोंढे सर यांनी या गावातील गरजू कुटुंबाना मदत केली. यासाठी (Henkel Adhesives Technologies India Pvt Ltd.) या कंपनीचे मॅनेजर डाॅ.प्रसाद ख॔डागळे तसेच शशी खोमणे, मोहन जाधव यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू व मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी गावातील सर्व मित्र व ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होती. या कार्यक्रमाचे नियोजन करणारे माझे आदरणीय मित्र श्री.विलास लोंढे सर आणि डॉ. प्रसाद खंडागळे सर तसेच श्री. शशि खोमणे, श्री. मोहन जाधव सर आणि गावकरी मंडळींचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.



Date - 19/06/2019
        संस्थेत " विश्रांती हाॅस्पिटल " भवानी पेठ, पुणे येथील कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ.ऋषिकेश दत्तपुरी गोसावी सर आणि डॉ.वैशाली ऋषिकेश गोसावी मॅडम आले होते.तसेच त्यांच्या बरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मा.नगरसेवक मा.दत्तात्रय गजानन गिरी साहेब तसेच मा.नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगर पालिका सौ.उज्वला दत्तागिरी ( मा.सभापती व प्रभाग समिती कल्याण ) तसेच समाजसेवक दत्तपुरी गोसावी,पुणे तसेच त्यांचे सहकारी आले होते.
    संस्थेत येण्याचं कारण म्हणजे त्यांची छोटी कन्या आराध्या हिचा पहिल्या वर्षाचा वाढ दिवसाचे निमित्ताने. सर्व पाहुणे मंडळी संस्थेत आपल्या घरात असल्या सारखे राहून खूप आनंद घेतला. सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कार्याची ओळख करून दिली.तसेच सर्वांनी जाताना पाहुणचाराचा आनंद घेतला आणि संस्थेला मदत करून आमचा निरोप घेतला.
      संस्थेत सर्व मोठी पाहुणे मंडळी आल्या बदल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

DATE - 29/03/2022 -   BIRTHDAY  CELEBRATIONS

DATE - 01/11/2021

नमस्कार. शुभ प्रभात.
        दरवर्षी प्रमाणे हया वेळी निरंकार बालग्रामची दिवाळी शैक्षणिक सहल दिनांक - 01/11/2021 ते 03/11/2021 हे दोन दिवस कोकणात -  दापोली येथे मुक्कामी गेली होती. बालग्राम मधील मुलांना जगाची माहिती कळावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून हा छोटासा प्रयत्न. सहलीला मुलांनी खूप मजा केली.
दरवेळी सहलीला खूप छान अनुभव येतो, तसाच अनुभव ह्यावेळी आला. 
        अशाप्रकारे आमची सहल आनंदाने पार पडली आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले त्या बद्दल निरंकार बालग्राम तर्फे मनापासून आभार मानतो.

SPONSOR BY - J.K.SIR, SUMIT DHAGE SIR, NEHA MADAM & OTHER PERSON.

Date - 19/11/2019

     नमस्कार आज माझ्या संस्थेला " Special Invitation " म्हणून VBGYOR HIGH SCHOOL , NIBM , Dorabji Mall , Pune. या ठिकाणी आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे या शाळेत प्रथमच मला जाण्याचा योग आला होता.आणि या शाळेतील खूप विद्यार्थी आणि शिक्षक आधीच माझ्या संस्थेत येऊन गेले आहेत.
       शाळेत गेल्यावर ज्यांनी मला व माझ्या स्टाफ ला आमंत्रण दिलं होतं त्या शिक्षकांनी खूप आनंदाने आमचे स्वागत केले.तसेच त्यांचे प्रिन्सिपॉल आदरणीय श्री. देवधर सरांनी खूप आपले पणाने स्वागत करुन शाळेबद्दल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी शिकवून गरजूंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले.
      या विद्यार्थ्यांचे शिक्षक मा.श्री.शिवराज पाटील सर, मा.श्री. नितीन सर आणि आदरणीय गौरी मॅडम या सर्वांच्या प्रयत्नातून माझ्या संस्थेला मदत मिळाली.तसेच आदरणीय प्रिन्सिपॉल मा. देवधर सर यांनी भविष्यात संस्थेला मोठ्या प्रमाणात मदतीचे आश्वासन दिले.
      माझ्या संस्थेला VIBGYOR HIGH SCHOOL यांच्या प्रिन्सिपॉल सर आणि शिक्षकांनी खास आमंत्रित केले त्या बद्दल आम्ही सर्व जण या सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो.


Date - 30/04/2020
          मनापासून सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्व जण काेराेनाच्या आजाराशी संघर्ष करत आपल्या कुटुंबाची आणि स्वतःच्या बरोबर समाजातील गरजवंत लोकांची पण काळजी घेत आहेत या बद्दल मी मनापासून सामाजिक संस्था, मंडळ, समाजसेवक, आणि वैयक्तिक मदत करणारे या सर्वांचे आभार मानतो.
आज आपणांस मनापासून कळविण्यात आनंद होत आहे की मला पुन्हा एकदा कोरोना च्या वाईट परिस्थिती मध्ये अडचणीत असलेल्या एका ताईला जी स्वतः एक TB & Hart या आजाराने ग्रस्त आहेत. तसेच तिचा उजवा हात निकामी होता.आणि या परिस्थितीत या भगिनीवर उपासमारीची वेळ आली होती विशेष म्हणजे तिला कोणीही नातेवाईक आणि मुल या वेळी जवळ नव्हते. यामुळे तिला मदतीसाठी घराबाहेर पडता येत नव्हते.
       अशा वेळी मला भुवनेश्वर (ओडिशा) येथून "Aide et Action" ही एक "International Organization" स्थलांतरित कामगारांच्या कल्याणासाठी कार्य करते. कोविड-लॉकडाऊन कालावधीत ते त्रासदायक स्थलांतरितांना स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि त्या भागात काम करणा-या सामाजिक संस्थांद्वारे अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. श्री. सरोजकुमार बारिक एड आणि Action मध्ये काम करत आहेत आणि भुवनेश्वर, ओडिशा येथे आहेत ऑनलाईन कर्मचार्‍यांच्या आधारे आवश्यक असणा-या Migrant या परप्रांतीय लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल या संदर्भात त्यांच्या ऑनलाइन कर्मचार्‍यांकडून पुण्यातील सविता माने यांना त्यांच्या कर्मचार्‍यांकडून माहिती मिळाली. श्री. सरोज यांनी तत्काळ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्वयंसेवी संस्था निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी,पुणे,भागात कार्यरत असलेले श्री. केशव धेंडे सर यांना फोन करून माने या ताईंना मदत करण्यासाठी विनंती केली आणि मग मी लगेचच वेळ न लावता जाणीव संघटनेचे माझे आदरणीय मित्र श्री.पाटील सरांना फोन करून त्यांना मदत करायला विनंती केली. लगेचच माझ्या विनंतीला मान देत पुढे फोन केले आणि खरोखरच या कामी आदरणीय श्री.आनंद भाऊ रीठे आणि आदरणीय श्री. शशिकांत काळे यांच्या कडून आदरणीय श्री.निलेश पवार यांनी स्वतः माने यांच्या घरी जाऊन धान्य दिले आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी जेवण देण्याचे मान्य केले.
        खरोखरच या कामी माझ्या फोनवरून केलेल्या विनंतीला मान देऊन जी मदत केली या बद्दल मी या सर्वांचा आभारी आहे.या पोस्ट मुळे मला कोणाचेही मन दुखवायचे नाही आणि असेल तर क्षमा असावी.

आपला सेवक .
केशव धेंडे, सर
Founder Director - Nirankar Shikshan Prasarak Mandal, Mahamad Wadi, Hadapsar, Pune - 60.
( International CSR Awards winning NGO. Date - Feb - 2019 & Feb - 2020 ) Mob - 9561816451
.

Date - 13/06/2021
     नमस्कार आज आपणांस मनापासून सांगण्यास आनंद वाटतो की समाजाची मनापासून सेवा करत असताना मी केलेल्या कार्याची पावती समाजाकडून मिळते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. तसेच जागतिक पुरस्कार मिळत असताना स्थानिक पातळीवर आपल्या कार्याचा गौरव होणं हे खूप महत्त्वाचे आहे. मला आशिया खंडातील जागतिक पुरस्कार जाहीर झाला आहे याचे औचित्य साधून आज माझ्या आणि मिसेसच्या हस्ते एक झाड लावून माझा सत्कार करण्यात आला. यासाठी सहकार्य प्रतिष्ठानचे माझे आदरणीय मित्र श्री. किरण तुपे आणि त्यांची सर्व सदस्य मंडळी यांचे मनापासून आभार मानतो.तसेच माझे आदरणीय मित्र श्री. जीवण बापू जाधव तसेच त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांचे मनापासून आभार मानतो.



Date - 10/10/2021
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील नामांकित काॅलेज मधील तरुण विद्यार्थी आले होते. सध्या हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या भेटीसाठी येण्याचे कारण म्हणजे या तरुण युवकांनी आपल्या बरोबरच्या सामाजिक विचारांशी सहमत असणार्या तरुण युवकांना बरोबर घेऊन समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक सामाजिक संस्था स्थापन केली आहे.या तरुण युवकांनी त्यांच्या संस्थेचे नाव SAHAS NGO असे ठेवले आहे. या संस्थेचे मार्फत या युवकांनी वर्षभरात भरपुर कार्यक्रम घेऊन एक प्रकारे समाजाची सेवा केली आहे.
    या सर्व तरुण युवकांना सामाजिक क्षेत्रातील परिस्थितीवर मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच साहस या संस्थेचे अध्यक्ष तस्लिम इनामदार मॅडम आणि अश्रफ शेख, खजिनदार, तसेच त्यांच्या सर्व युवकांचे माझ्या संस्थेच्या वतीने आभार मानले.



Date - 31/12/2021
    नमस्कार सर्व प्रथम समाजातील माझ्या सर्व आदरणीय व्यक्तींना एक दिवस आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
   आज संस्थेमध्ये आपल्या आवडत्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी माझे आदरणीय तरुण समाजसेवक सर्व मित्रांना घेऊन आले होते.हे सर्व तरुण समाजसेवक " पोलिस मित्र समीती, महाराष्ट्र राज्य " या संस्थेचे होते. या संस्थेचे खजिनदार आदरणीय श्री. सागर भाऊ गावडे यांचा वाढदिवस या सर्व मित्रांनी माझ्या संस्थेत साजरा केला. तसेच वाढ दिवसांच्या निमित्ताने सर्वांना जेवण दिले होते.याचे सर्व श्रेय जाते ते माझे आदरणीय मित्र श्री. किरण दादा गायकवाड यांना. यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला आहे.
     मला आवर्जून या ठिकाणी तुम्हा सर्वांना सांगावे वाटते की आजची तरुण पिढी, युवक युवती स्वतः हून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भाग घेऊन समाजातील गरीब गरजू लोकांना मदत करत आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या वाढ दिवसांचा होणारा वायफळ खर्च टाळून तो खर्च सामाजिक कार्यात द्यायला लागले आहेत हे खूपच आनंददायी आहे. आणि म्हणूनच माझ्या संस्थेच्या वतीने यांना मानाचा मुजरा.


Date - 23/08/2021
     नमस्कार आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील निराधार, वंचित, भटकी तसेच शिक्षणापासून वंचित अशा अनाथ आश्रमातील " वात्सल्य गुरुकुल सदन " या संस्थेला माझ्या संस्थेच्या वतीने अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली. आणि विशेष म्हणजे या आश्रमाचे काम पाहणारे माझे आदरणीय वडील समान विजय जाधव सर हे खूप दिवस मला मदत करावी म्हणून विनंती करत होते. म्हणून आज खास वेळ काढून त्यांच्याकडे गेलो होतो.
आणि खरोखरच या संस्थेला कोणीतरी मदत करण्याची गरज होती. कारण म्हणजे या मुलांना एक वेळ जेवणाची सोय होत नव्हती आणि भाजी बनवताना तेला ऐवजी कांदा आणि पाणी व मीठ मसाला घालून मुलांना जेवण बनवून द्यायचे.मला खरोखरच आनंद झाला की अशा मुलांना व संस्थेला मी मदत करू शकलो. यासाठी माझे आदरणीय देणगीदार यांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.


DATE - 02/09/2019 - GANESH FESTIVAL ACTIVE 


Date - 01/11/2020
       नमस्कार आज श्री भैरवनाथ प्रतिष्ठान वडगाव शेरी, पुणे येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोरोना परिस्थितीत रूग्णालयात रक्ताचा पुरवठा कमी पडायला लागला होता या कारणास्तव शिबीर भरवण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मंडळ नेहमी सामाजिक क्षेत्रात कायम आघाडीवर राहिलेला आहे.यांचे कार्य सतत चर्चेत राहिले आहे. मंडळाच्या या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा.
        याच कार्यक्रमात कोरोना मध्ये गरीब लोकांना आणि इतर गरजूंना मदत करणारे सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमात मला आमंत्रित करून पुरस्काराने गौरवण्यात आले.तसेच मला मंडळाच्या वतीने मा.श्री. रविंद्र बापूसाहेब पठारे यांचा सत्कार माझ्या हस्ते करण्यात आला आणि तसेच इतर मान्यवर व्यक्तींचा सुद्धा सत्कार माझ्या हस्ते करण्यात आला. यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.



Date - 01/03/2021
       नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील आय टी पार्क मधील य॑ग जनरेशन आले होते. निमित्त होते ते माझ्या संस्थेचे 18 वर्षांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल माहिती आणि प्रत्यक्ष संस्थेचे जवळून कार्य पहाण्यासाठी.या सर्वांनी खूप आस्थेने संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि आम्ही सर्व जण असेच समाज कार्य करण्याचा प्रयत्न करू असं म्हणाले.
     खरोखरच मला या य॑ग जनरेशनचा अभिमान वाटतो कारण आजच्या या कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक गणित चूकलेले आहे आणि या परीस्थितीत या य॑ग जनरेशन कडून सामाजिक भान ठेवून संस्थेला अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 01/06/2021
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील सामाजिक क्षेत्रातील तरुण कार्यकर्ते आले होते. ह्या सर्व तरुण मंडळीना माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती मिळाली होती. आणि कोरोणा मध्ये माझ्या संस्थेच्या वतीने गरीब लोकांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली होती याची माहिती यांना कळाली. याच कारणामुळे यांनी माझ्या संस्थेला मदत करण्याच्या दृष्टीने भेट दिली.
    विशेष म्हणजे आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेची कोरोणा काळात गरीबांना केलेल्या मदतीमुळे " Government of India NITI AAYOG " यांनी दखल घेऊन रिपोर्ट मागविला. आणि लगेचच संस्थेचा कार्याचा रिपोर्ट मेलवर पाठविण्यात आला. आणि हे सर्व कार्य माझ्या हातून होण्या मागे खरा सपोर्ट आहे तो माझ्या समाजातील दानशूर व्यक्तींना आणि संस्थेच्या हितचिंतकांना जाते. या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 11/07/2021
      नमस्कार आज आपणांस मनापासून कळविण्यास आनंद होत आहे की "INTERNATIONAL ONLINE CHARITY EVENT" साठी माझ्या संस्थेची निवड करण्यात आली होती. ह्याचे सर्व श्रेय जाते ते फक्त " HFEN - Health First everything next Charitable foundation " Pune. या संस्थेला.
      या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे " HFEN's 90 Days Healthy Lifestyle Challenge Programme - 28 (2000+ Participants from 35 countries) is successfully going on. 100s & 100s of participants are getting benefited " from this program. या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या बद्दल आम्ही सर्व जण HFEN TRUST & TEAM यांचे मनापासून आभार मानतो.
    खूप अभिमान वाटतो की माझ्या कार्याची दखल घेऊन जागतिक पातळीवर माझ्या संस्थेची निवड करुन माझ्या संस्थेला मदत करतात. आणि खरोखरच याचे सर्व श्रेय जाते ते फक्त माझ्या समाजातील सर्व घटकांना.


Date - 09/11/2019

       नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी IBM , IT Park, फुरसुंगी, हडपसर येथील IT मधील इंजिनिअर आले होते.
       संस्थेत येण्याचं कारण म्हणजे त्यांच्याच एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून आले होते. ह्या सर्व तरुण मंडळींना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी पण कशाप्रकारे शिक्षण घेऊन आज इंजिनिअर झाले आहेत या बद्दल माहिती दिली. तसेच नोकरीच्या कमाईचा एक छोटासा हिस्सा अशा सामाजिक कार्यासाठी काढून ज्यांना खरी गरज आहे त्यांच्या पर्यंत प्रत्यक्ष भेटून द्यायचा.खरोखरच त्यांच्या या विचारांना मी मनापासून सलाम करतो.
       IBM , IT मधील तरुण मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप आभार मानतो.

Date - 02/04/2022
नमस्कार सर्व प्रथम माझ्या आदरणीय सर्व व्यक्तींना गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझ्या संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आजची हि पोष्ट करण्यामागचे कारण म्हणजे आज माझ्या संस्थेत 19 वर्षांचा एक तरूण मला भेटायला आला होता. हा तरुण नागपूर येथून पुण्यात तीन महिन्यांपूर्वी आला होता आणि आता सध्या वडगाव शेरी येथे पत्र्याच्या भाड्याच्या खोलीत तो आणि त्याची आई असे दोघेही एकत्र राहतात. त्याचे वडील तीन महिन्यांपूर्वी देवाघरी गेले आहेत. वडीलांच्या जाण्याने या माय लेकरांना जवळ पैसे नाहीत आणि त्यामुळे त्यांना एकवेळ जेवणाची अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी या मुलाने खराडी येथे काम शोधून आहे त्या पगारातून आईला हातभार लावायला सुरुवात केली. कमी पगार तसेच घरभाडे,इतर खर्च यामुळे खुपचं वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मला कसं कळाले तर माझ्या मुलीच्या बरोबर हा मुलगा कामाला आहे. कामामध्ये तिला त्याच्या बद्दल कळाले होते. म्हणून मग माझ्या मुलीने त्याला सांगितलं की माझ्या बाबांचे अनाथ आश्रम आहे ते तुला नक्कीच मदत करतील.
हे ऐकून त्याला खूप मोठा आधार झाला आणि मग मला माझ्या मुलीने फोनवर सर्व त्यांच्या घरच्या परिस्थिती बद्दल सांगितलं आणि आज तो मला भेटायला आला होता. आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने काहितरी नवीन सुरुवात करायचा विचार करतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आज मला परमेश्वराने एक अनाथ गरीब कुटुंबाला अन्नधान्य या स्वरुपात मदत करून गुढी पाडवा निमित्ताने एक चांगले कार्य करण्याची संधी दिली आहे या बद्दल मी परमेश्वराचे आणि समाजातील सर्व व्यक्तींचे जे माझ्या संस्थेला मोकळ्या मनाने मदत करतात तसेच माझ्या मुलीचे मनापासून आभार मानतो.
आपला.
केशव धेंडे, सर (BA LLB)

.


Date - 15/08/2019
      नमस्कार आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संस्थेला भेट देण्यासाठी Engineering College ची तरुण पिढी आली होती.विशेष म्हणजे या तरुण मुलांच्या मध्ये समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धडपड दिसली.
      याच ध्येयाने झपाटलेल्या या तरुण मुलांनी Engineering college साठी आवश्यक असणारी पुस्तके Online पुरविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी यांनी " Online ABC " या नावाने वेबसाईट सुरू केली आहे. या द्वारे गरजूंना पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहे. यांच्या या संकल्पनेतून चांगली एक सेवा समाजासाठी उपयोगी पडत आहे.
      Online ABC या टिमला पुढील कार्यासाठी माझ्या संस्थेकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा.आणि माझ्या संस्थेत आल्या बद्दल या सर्वांचे मनापासून आभार मानतो
.

Date - 04/09/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 28/10/2019

      आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा श्री. KIPA TAKAR, Sir व उपाध्यक्ष मा.मिस.MARGE BASAR, Madam आणि Mr.KARGO BASAR तसेच या सर्वांना सोबत घेऊन येणारे UPS Logisties, Pune. चे मा.श्री. मयुर भंडार सर हे सर्व जण आले होते. या सर्वांना प्रथम दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
        संस्थेत आल्यानंतर पाहुण्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या आणि अरुणाचल प्रदेश येथील विद्यार्थी संघटनेच्या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्वांना संस्थेत आल्यानंतर खूप छान आणि आनंद झाला. माझ्या संस्थेच्या बरोबर भविष्यात काम करण्याची संधी मिळावी म्हणून अध्यक्षस्थानी मला विनंती केली आणि ती मी लगेचच मान्य केले.आणि विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्त्यांना परत संस्थेच्या भेटीसाठी घेऊन येणार आहेत त्यासाठी मला विनंती केली.
        खरोखरच या पाहुण्यांच्या बरोबर कसा एक तास गेला ते कळालेच नाही. माझ्या संस्थेत भेटीसाठी आलेल्या या पाहुण्यांचे आम्ही मनापासून सर्व जण आभार मानतो.

Date - 24/10/2019
      नमस्कार सर्व प्रथम माझ्या संस्थेच्या वतीने समाजातील माझ्या सर्व आदरणीय गुरुजनांना आणि बंधू भगिनींना तसेच छोट्या मंडळींना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
    आज संस्थेला भेट देण्यासाठी साऊथ इंडियन तरुण मंडळी आली होती. हे सर्व IT कंपनीतील इंजिनिअर होते. संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी आणि संस्थेला CSR मध्ये मदत करण्यासाठी भेट देण्यासाठी आले होते. संस्थेत या मंडळींना खूप छान वाटले. भरपूर त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या.
    साऊथ इंडियन तरुण मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून खूप आभार मानतो.


Date - 01/12/2020
नमस्कार आज माझ्या संस्थेच्या भेटीसाठी माझे आदरणीय समाजसेवक मित्र मा.अशोक भाऊ काकडे (संस्थापक अध्यक्ष - दिव्या फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, बुलढाणा,) आले होते.
तसे पहाता अशोक भाऊ हे त्यांच्या समाज कार्यात सतत बिझी असतात पण त्यांच्या संस्थेचा विशेष कार्यक्रम " भुमिपुजन सोहळा आणि रूग्णवाहिका लोकार्पण " Date - 03 जानेवारी 2021 रोजी असल्याने मला या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण देण्यासाठी आले होते.
माझ्या संस्थेत येऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 19/10/2019

     आज संस्थेला भेट देण्यासाठी तरवडे वस्ती, महंमदवाडी येथील डॉ दादा गुजर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि पाहुणे मंडळी आली होती.विशेष म्हणजे आजच्या या धकाधकीच्या जीवनात काॅलेज विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईल मधून वेळ काढायला मिळत नाही आणि त्यात हे विद्यार्थी बिझी असतात. पण खरोखरच या इयत्ता -11 वीतील विद्यार्थ्यांना मानावं लागेल की आपण पण या समाजात राहतोय आणि या समाजाचं आपण देणं लागतोय.या विचाराने या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊतील शिल्लक राहिलेल्या रकमेतून संस्थेतील सर्व मुलांना खाऊ घेऊन आले होते.
      विशेष म्हणजे या सर्वांना समाजाची जाणीव करून देणारे माझे आदरणीय मित्र श्री. उमेश कोंढाळकर सर यांनी माझ्या संस्थेत घेऊन आले होते. तसेच विद्यार्थ्यां बरोबर स्थानिक पाहुणे मंडळी यांना पण बरोबर आणले होते.
   डॉ.दादा गुजर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि आदरणीय उमेश कोंढाळकर सर आणि पाहुणे मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

DATE - 26/05/2019 BIRTHDAY CELIBRATION

DATE - 15/04/2022 ONE DAY TRIP TO  KHOPI VILLAGE


Date - 24/12/2019
        नमस्कार आज दिनांक - 24/12/2019 हा दिवस म्हणजेच आदरणीय गुरुवर्य पांडुरंग सदाशिव साने ( 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 ) यांचा वाढदिवस आहे.
" खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभुची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. "
        मराठीचे प्रसिद्ध लेखक , शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि भारत स्वतंत्र संग्राम सेनानी. अशा या महान व्यक्तीला माझ्या कडून आणि संस्थेच्या वतीने वाढ दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा.

आपला.
केशव धेंडे,सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर,पुणे. - 60.
( International CSR Award Winning NGO - February - 2019 )


Date - 07/09/2020
       नमस्कार आज आपणांस मनापासून सांगावे वाटते की या कोरोना मध्ये मी माझ्या संस्थेच्या वतीने डॉ दादा गुजर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर येथील विद्यालयातील 1 ली ते 10 चे गरीब व हुशार चार विद्यार्थीनी आणि 11 वी. सायन्स चा एक विद्यार्थी असे पाच विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी भरण्यात आली.तसेच 11 वीच्या विद्यार्थीने माझा फोटो घेऊन छान माझे चित्र काढून मला भेट स्वरूपात दिली.
    हे सर्व पाच विद्यार्थ्यांची निवड विद्यालयाचे मुख्यधयापक मा.श्री.डी.एम.पाटील सर आणि कला शिक्षक मा.श्री.नल्ला सर यांनी केली होती.खरोखरच हे सर्व विद्यार्थी हुशार तर होतेच पण शैक्षणिक फी भरण्यासाठी त्यांची ऐपत नव्हती.मला अभिमान वाटला की मी या मुलांना शैक्षणिक मदत करू शकलो.तसेच या विद्यालयात मी सन 1995 To 1997 या काळात Clark या पदावर काम करत होतो आणि याच काळात कमी पगार असताना सुद्धा मी चार मुलींच्या शैक्षणिक फी साठी मदत करत होतो.
      आज समाजात 17 वर्षे कार्य करत आहे ते केवळ माझे कष्ट आणि प्रामाणिकपणा, आणि चिकाटी आहे.याच बरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला या कार्यात सहजपणे मदत करणारे माझे सहकारी आणि आदरणीय देणगीदार यांचा मोलाचा वाटा आहे.
आपला सेवक
केशव धेंडे, सर


Date - 01/07/2019
        नमस्कार आज संस्थेला भेट देण्यासाठी सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या आदरणीय डॉ. प्रिती बुंडेला मॅडम आणि त्यांची कन्या आल्या होत्या.
       डॉ. प्रिती मॅडम आणि त्यांची कन्या ह्या एक महिन्यासाठी भारतात परत आल्या आहेत. विशेष म्हणजे मला " International CSR Award " मिळालेला होता तो मॅडमानी आॅनलाईन पाहिला होते या कारणांमुळे मला व संस्थेच्या भेटीला आले होते.अजून एक कारण म्हणजे त्यांची कन्या आता मेडीकल कॉलेज शिक्षण घेत असून तिला आई सारखे डाॅकटर बनून समाजाची सेवा करायची आहे.तसेच आता एक महिन्याच्या सुट्टीत गरीब मुला मुलींना इंग्रजी शिकवायला वस्तीत जात आहेत.
      संस्थेत डॉ मॅडम आणि त्यांची कन्या आल्या बदल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 16/10/2021
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील नामांकित काॅलेज " AISSMS ( College of Hotel Management And Catering Technology ) Pune. येथील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक मॅडम आले होते. या काॅलेजने संस्थेच्या कार्याची माहिती ऐकली आणि लगेचच संस्थेच्या भेटीसाठी आले होते. संस्थेत आल्यावर त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेला भेट दिली या बद्दल त्यांना खूप आनंद झाला आणि भविष्यात संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले.
    तसेच पुण्यातील नामांकित वाडिया महाविद्यालयात दोन विद्यार्थी आणि बिशप स्कूल, पुणे येथील दोन विद्यार्थी असे मिळून सर्व जण संस्थेच्या भेटीसाठी आले होते. विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच त्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता संस्थेत आल्या बद्दल.
वरील सर्व पाहुणे मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 14/06/2020 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 13/06/2020 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 15/09/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 05/05/2021
नमस्कार आज पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीने एका गरीब कुटुंबाला धान्याच्या स्वरुपात मदत केली आहे. या कुटुंबातील मातेचे नाव शांताबाई कुदळे रहाणार मांजरी बुद्रुक येथील आहे. यांनी मला मागच्या आठवड्यात फोन करून मदती साठी विनंती केली होती. शांताबाई यांच्या घरात एकूण पाच सदस्य आहेत. कमावणारा व्यक्ती काम नसल्यामुळे घरातच बसून आहे. शिवाय बाहेर पडण्यास बंदी असल्याने काम शोधता येत नाही.तसेच तीन लहान मुले आहेत. शेवटी आईला बाहेर पडून मदतीसाठी वाट बघावी लागते.
माझ्या संस्थेच्या वतीने या कुटुंबातील सदस्यांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करता आली हेच माझे भाग्य आहे. या मदतीसाठी माझ्या संस्थेचे आदरणीय देणगीदार यांचे मोठे श्रेय आहे. या बद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे,सर.


Date - 17/01/2020

    नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की मला म्हणजे माझ्या संस्थेला विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय जाते ते म्हणजे मागच्या वर्षी 18 फेब्रुवारी 2019 रोजी ( TAJ LAND Hotel, Mumbai ) येथे मिळालेला International CSR Award..
    या वर्षी 5th Feb , 2020 / Hotel Hyatt Regency , Mumbai. या ठिकाणी संस्थेला " CSRBOX & NGOBOX यांनी मला आमंत्रित केले आहे. खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आजपर्यंत मी करत असलेल्या संस्थेच्या कार्याला आपल्या आशिर्वादाने हे सर्व शक्य झाले आहे असं समजतो. आणि याचे सर्व श्रेय फक्त मला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना.
     मला व माझ्या संस्थेला आमंत्रण दिले आहे त्या बद्दल आम्ही सर्व जण " CSRBOX & NGOBOX या टिमला आभार मानतो.

Date - 01/04/2021
   नमस्कार आज " निर्मल सेवा फाउंडेशन वृद्धाश्रमातील आजींना कोरोणा लस देण्यासाठी महंमद वाडी हडपसर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते. या ठिकाणी या आजींना कोरोणा लस देण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून निर्मल सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय नलिनी धेंडे मॅडम आणि संस्थेचे सदस्य आदरणीय श्री. आदित्य चरेगावकर सर यांनी केले आहे. यांच्या विशेष प्रयत्नांतून या आजींना कोरोणाची लस देण्यात आली.
     या सर्व आजींना सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी या संस्थेने मला पत्र दिले आणि विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला मान देऊन मी लगेचच त्यांना होकार दिला आणि सर्व आजी व त्यांचे सहकारी यांना गाडीत घेऊन दवाखान्यात नेले.मनाला खूप समाधान वाटले की माझ्या आई समान सर्व आजींना लस देण्यासाठी माझी मदत झाली.
   हे सर्व सहज शक्य झाले आहे ते सरकारी दवाखान्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता म्हणून. यासाठी मनापासून आम्ही सर्व जण त्यांचे आभार मानतो.



Date - 10/03/2021
         नमस्कार काल जागतिक महिला दिनानिमित्ताने पुण्यातील " सुहास साईल प्रतिष्ठान वानवडी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून माझ्या संस्थेला सुसज्ज अशी लायब्ररी चा सेट देणगी मध्ये देण्यात आला.
या मदतीबद्दल माझे आदरणीय सहकारी श्री. विलास लोंढे सर यांनी पुढाकार घेऊन माझ्या संस्थेला मदत मिळवून दिली. " सुहास साईल प्रतिष्ठान चे अध्यक्षा आदरणीय स्वाती साईल मॅडम आणि त्यांचे सहकारी आदरणीय मनिषा पोतदार मॅडम यांच्या बरोबर " लोकसेवा महिला मंडळ, पुणे या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय मिना गायकवाड मॅडम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री. राजेंद्र कांबळे साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सुरेख कार्यक्रमाचे सर्व नियोजन आदरणीय श्री. विलास लोंढे सरांनी अगदी मनापासून केले आणि त्यांच्या या सहकार्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक छान कार्यक्रम झाला.
  माझ्या संस्थेला लायब्ररी सेट देणगी दिल्या बद्दल आम्ही सर्व जण सुहास साईल प्रतिष्ठान वानवडी पुणे आणि आदरणीय विलास लोंढे सर तसेच इतर मान्यवरांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.

Date - 05/10/2019

    नमस्कार आज संस्थेत परत एकदा कार्याची दखल घेऊन UPS Logistics (US) मगरपटटा सिटी, हडपसर येथील पाहुणे मंडळी भेटायला आले होते. या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
   आल्यावर त्यांनी सर्वांच्या बरोबर वेगवेगळ्या Activity घेतल्या तसेच भेट वस्तू दिल्या. या सर्व पाहुणे मंडळींनी भरपूर आनंद घेतला. भविष्यात संस्थेला मोठ्या प्रमाणात CSR Activity मध्ये मदत करणार आहेत.
    संस्थेत UPS ची सर्व पाहुणे मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व
जण त्यांचे मनापासून आभार मानतो.

Date - 24/10/2021
नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी CSR Activities साठी हडपसर,मगरपटटा, पुणे येथील कंपनी "Spring Advisory LLP " यांचा ऑफीस स्टाफ आला होता. कंपनीचे डायरेक्टर श्री. जे.के.सर यांनी त्यांच्या स्टाफ मधील साक्षी मॅडम यांचा वाढदिवस संस्थेच्या मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला. तसेच या वाढ दिवसांच्या निमित्ताने सर्व मुलांना दिवाळी कपडे भेट देण्यात आली. यामुळे सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
विशेष म्हणजे कंपनीने CSR Activities मध्ये संस्थेला दिवाळीच्या निमित्ताने मुलांना मदत केली. यासाठी कंपनीचे माझे आदरणीय मित्र श्री. भगवान लोटे सरांनी विशेष सहकार्य केले म्हणून आजचा हा कार्यक्रम झाला आहे. यासाठी माझ्या संस्थेच्या वतीने " Spring Advisory LLP " या कंपनीचे डायरेक्टर श्री. जे.के.सर आणि त्यांचे सहकारी यांचे मनापासून आम्ही सर्व जण त्यांचे आभार मानतो.


DATE - 20/03/2021 -  BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS

DATE - 13/03/2021 -  BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS

DATE - 04/09/2020 BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS


Date - 06/07/2020
काही गुरू आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर आपल्या बरोबर असतात किंवा काही काही काळापुरते असतात. पण त्यांचे मार्गदर्शन मात्र तितकेच मोलाचे असते.असे सगळे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या बरोबर असतात आपल्याला भेटतात मार्गदर्शन करतात त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला गुरू स्थानी मानणारे माझे आदरणीय मित्र मा. श्री.राहूल ढवान सर (सरपंच आणि अराध्या NGO सपोर्ट सेंटरचे संस्थापक अध्यक्ष) मला भेट देण्यासाठी माझ्या संस्थेत आले होते.
खरोखरच खूप छान वाटले की मी ज्या व्यक्तीला माझ्या परीने छोटेसे मार्गदर्शन केले आणि आज ती व्यक्ती एका मोठ्या NGO सपोर्ट सेंटरची जबाबदारी सांभाळतात आणि या माध्यमातून समाजातील गरीब व गरजूंना मदत करतात.काल झालेल्या गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने माझ्या कडून त्यांना भरभरून शुभेच्छा.



Date - 15/08/2020
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी माझे आदरणीय मित्र मा. श्री.मोहनीश जाधव, सर ( शिवसेना नेते) आणि आदरणीय रजनी मॅडम तसेच मंत्रालय, (मुंबई) येथील रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट मधील अधिकारी आले होते.
        या सर्वांनी संस्थेत येण्यामागचे कारण म्हणजे माझे मित्र मोहनीश जाधव सरांचा वाढ दिवस होता, पण तो चार तारखेला साजरा करण्यात आला होता.मला सकाळी सरांनी फोन करून संस्थेत येण्यासाठी विचारले होते. दुपारी सर्वजण आले.सरांनी वाढ दिवसांच्या निमित्ताने केक कापला तसेच मुलांच्या आरोग्यासाठी औषध आणि खाऊ भेट दिले.तसेच आमच्या लाडक्या रजनी मॅडम यांनी संस्थेला आर्थिक मदत केली.
       आदरणीय सर्व पाहुणे मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 13/11/2019

       नमस्कार आज सकाळी संस्थेत हांडेवाडी , हडपसर येथील JSPM College मधील Cygnet Public School ची इयत्ता - 6 वीचे विद्यार्थी संस्थेला भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या बरोबर क्लास टिचर आणि PT शिशक तसेच मावशी आणि काका आले होते.
         संस्थेत आल्यावर सर्व मुलांच्या विनंतीवरून त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सर्व मुलांचा एक तास मला मिळाला आणि या तासात मुलांना छान मार्गदर्शन केले. मुलांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.एक तास कसा गेला हे कळालेच नाही.खरोखरच आज सर्व मुलांच्या मध्ये मी स्वतः एक विद्यार्थी बनून गेलो होतो.
         Cygnet Public School चे विद्यार्थी,शिक्षक आणि मावशी व काका संस्थेच्या भेटीला आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप आभार मानतो.

DATE - 02/03/2021 -  BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS


Date - 23/07/2021
     नमस्कार सर्व प्रथम आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने समाजातील माझे सर्व आदरणीय शिक्षक आणि आदरणीय थोर व्यक्तींना माझ्या संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
     तसेच आजच्या दिवसांचे माझ्या साठी महत्व म्हणजे माझ्या आश्रमातील मुलगा प्रणव होमकर याला एका गरीब कुटुंबातून आणून लहानपणापासून सांभाळून मोठं केलं आहे.आणि शिक्षण देऊन तो Government ITI पास झाला आहे. नोकरीला लागणार आहे तसेच त्याच्या बरोबर त्याचा लहान भाऊ जो आता बारावी सायन्स शिकत आहे. मला एकच मनापासून समाधान वाटते की माझ्या आश्रमातील मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहून आयुष्यात काही तरी चांगलं करुन समाजाचा एक चांगला नागरिक घडणार आहे.
   आणि आजच्या या गुरू पौर्णिमा निमित्ताने त्याने दिलेल्या मला शुभेच्छा ह्या खूप लाख मोलाच्या आहेत.

Date - 24/01/2020

     नमस्कार संस्थेच्या भेटीसाठी महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या विवीध जिल्ह्यातील तरुणाई आली होती. या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती मिळाली आणि प्रत्यक्ष भेटायला माझ्याकडे आले होते.
      या सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे हि सर्व तरुणाई पंजाब, बेंगलोर, मद्रास, आणि दिल्ली येथील काॅलेज विद्यार्थी होते. खरं पहायला त्यांच्या बरोबर बोलताना भाषेची अडचण आली होती. यामुळे कोणा बरोबर इंग्लिश तर कोणा बरोबर हिंदी भाषेत माझ्या कार्याची माहिती द्यावी लागली. संस्थेत आल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद दिसत होता.
     मला आनंद वाटतो की आजची तरुणाई मला भेटायला येते आणि सामाजिक कार्याची माहिती घेतात. मला शक्य होईल तेवढे त्यांना मार्गदर्शन करतो.

Date - 17/05/2019

     नमस्कार आज संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील कायदेतज्ञ, वकील, डॉक्टर आणि वरीष्ठ समाज सेवक आले होते. आज खरोखरच संस्थेमध्ये ही मंडळी आल्याने एका प्रकारे वेगळेच आपलं पणाचे वातावरण निर्माण झाले होते. 
     हि वरीष्ठ मंडळी माझ्या संस्थेत आल्यावर मनापासून खूप गप्पा मारल्या आणि हसरं वातावरण निर्माण झाले होते.अस अजिबात वाटलं नाही की हि मंडळी प्रथमच संस्थेत आले होते म्हणून. आम्ही सर्वजण आपापल्या क्षेत्रातील अनुभव समजून घेतले.खूप वेळ चांगल्या प्रकारे गप्पागोष्टी झाल्या.
    वरील मान्यवर व्यक्ती माझ्या संस्थेत आल्या बदल मी या सर्वांचा मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 27/08/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 27/05/2021
        नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री. सखाराम कांबळे सर आणि आमचे आदरणीय श्री. विलास लोंढे सर हे आले होते. संस्थेचे कार्य जवळून पाहण्यासाठी लोंढे सरांनी कांबळे सरांना आणले होते. संस्थेत आल्यावर कांबळे सरांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे कार्य जवळून पाहिले यामुळे कांबळे सरांना खूप आवडले.
    तसेच पुणा काॅलेजचे प्रिन्सिपॉल आदरणीय प्रोफेसर डॉ. आफताब अन्वर शेख यांच्या बरोबर सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल एक छान मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती सरांना दिली. तसेच शेख सरांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. या मिटिंगमध्ये मला एक सामाजिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तींला भेटण्याचे भाग्य भेटले.याचे सर्व श्रेय आदरणीय लोंढे सरांना जाते कारण त्यांनी हे सर्व घडवून आणले होते म्हणून. या बद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 12/09/2019

       नमस्कार आज गणपती बाप्पाच्या आशिर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मला पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी सम्पूर्ण काॅलेजची फि भरण्यासाठी माझे आदरणीय व माणसातला देव माणूस माझ्या पाठीशी उभे राहिले.
         या देव माणसाचं नाव आहे आदरणीय काकासाहेब गलांडे.( प्रसिद्ध उद्योजक आणि दानशूर व्यक्तीमत्व ) वडगाव शेरी,पुणे. यांच्या बद्दल सांगायचे म्हणजे काकांना फक्त मी फोनवरून मदतीची चौकशी केली होती आणि याला लगेचच मला मदतीसाठी त्यांच्या आॅफीसवर बोलवून घेतले आणि आस्थेने माझी व संस्थेची चौकशी केली.व लगेचच मला आधी काॅलेजची फी भरण्यासाठी चेक दिला.खरेतर काकांचे म्हणणे आहे की समाजात शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून माझी ही छोटीशी धडपड आहे. जेव्हा काकांनी मला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली त्या वेळी पटकन माझ्या डोळ्यात पाणी आले.मला लहान पणी शिकता आले नाही म्हणून मी आता मोठेपणी शिक्षणाची आशा सोडली नाही. आणि माझं भाग्य म्हणजे सोळा वर्षांच्या समाज सेवेचे हे फळ आहे. काकांचे खूप स्पष्ट आणि सडेतोड विचार आहेत.
     काकांनी मला शिक्षणासाठी जे भक्कम आर्थिक पाठबळ दिले त्या बद्दल मी आयुष्यभर त्यांचा आभारी राहीन.

Date - 27/12/2019

       नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी " COMAND HOSPITAL , Wanavadi , Pune . येथील Nurceing Hospital च्या प्रमुख कॅप्टन एकता मॅडम आणि त्यांचे कुटुंबीय आले होते.
खास करून संस्थेच्या कार्याची दखल घेऊन आणि वैयक्तिक पातळीवर संस्थेला काही मदत करता येईल का विचाराने त्या स्वतः आल्या होत्या. त्यांच्या स्वतःच्या स्वभावात असं वाटलं नाही की त्या स्वतः एक Captain आहेत. खूप मनमिळाऊ आणि सर्वांना समजून घेणारी व्यक्ती होत्या. त्यांनी हाॅस्पिटल मधील काही गरीब पेशंटना कशा पद्धतीने सहकार्य केले त्या बद्दल माहिती दिली. त्यांचे वैयक्तिक मत असे आहे की काही वर्षांनी सरकारी जाॅब सोडून समाजातील गरजू लोकांना मदत करायची.त्यांचे मिस्टर सुद्धा एक शिक्षक असून गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात. खरोखरच हे सर्व खूप सोशल वाटले.
संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.


Date - 05/08/2021
      नमस्कार आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या हस्ते संस्थेतील अनाथ मुलीचे लग्न करुन दिले होते. तसेच तिच्या पुढिल भविष्याचा विचार करून लग्नाआधी तिचा संस्थेच्या वतीने सुरुवातीचा तीन महिन्यांचा सर्व साधारण एक हप्ता भरून LIC पाॅलिसी चालू केली होती. आज तिच्या भरलेल्या LIC पाॅलिसीची कागदपत्रे आमचे आदरणीय मॅडम लक्ष्मी पैरासी ( LIC Agent, Pune) यांनी माझ्या हस्ते साक्षीला दिले.
     हे सर्व देताना तिच्या चेहऱ्यावर चे समाधान खूप काही मला देऊन गेले आहे. आजच्या या कोरोना मधील परिस्थिती मध्ये मला एकच सांगावं वाटत की आपण जे काही एकमेकांना समजून मदत कराल तेच आज तुमच्या सोबत येणार आहे. आणि हाच खरा आशिर्वाद आपल्या सोबत शेवट पर्यंत येणार आहे.कारण जाताना आपण बरोबर काहीच घेऊन जाणार नाही.
    आणि मला आनंदाने सांगावे वाटते की माझ्या या अठरा वर्षांच्या कालावधीत समाजातील माझे आदरणीय देणगीदार आणि संस्थेचे हितचिंतक या सर्वांच्या मदतीमुळेच मला एक प्रकारे शक्ती मिळाली आहे आणि म्हणूनच मी समाजातील गरीब व गरजू कुटुंबाना मदत करू शकत आहे या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 24/07/2019

        नमस्कार आज हडपसर,काळेपडळ येथील संस्थेच्या Computer Training institute मध्ये खास संस्थेच्या खास निमंत्रणाला मान देऊन गेलो होतो.
संस्थेच्या 10 वी आणि 12 वीच्या मुला मुलींना तसेच महिलांना करिअर मार्गदर्शन संदर्भात चर्चा आणि मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी माझ्यासाठी नवीन होते. या सर्वांना मार्गदर्शन करताना आधी मी त्यांच्या बरोबर मैत्रीचं नातं निर्माण केले.आणि मग त्यांना करिअरच्या संधी आणि आॅनलाईन कामासंदर्भात छान मार्गदर्शन केले. सर्व मुलं मुली आणि महिलांनी शांतपणे माझं ऐकून घेतले. या ठिकाणी सांगताना मी सर्वांच्या बरोबर खेळी मेळीच वातावरण तयार केले होते. सर्वांनी खूप आनंद घेतला. मला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लहानपणी चे दिवस आठवले.
     संस्थेनी मला या योग्य समजून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेच्या प्रमुख आदरणीय बालिका ताई आणि त्यांचे आदरणिय सहकारी वर्ग या सर्वांचा मी मनापासून खूप खूप आभार मानतो.

DATE - 14/03/2020 - NIRANKAR BALGRAM SPECIAL NON VEG PARTY, HADAPSAR,PUNE - 28

DATE - 31/01/2021 -  BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS


Date - 27/11/2020
नमस्कार आज संस्थेच्या भेटीला काॅलेज तरुणाई आली होती. संस्थेत येण्या मागचे कारण म्हणजे या काॅलेज तरुणाईतील प्रतिक्षा गायकवाड या मैत्रीणी चा वाढ दिवस साजरा करण्यासाठी.
मला नेहमीच काॅलेज तरुणाईतील युवकांचा अभिमान आणि आदर वाटतो कारण या वयात यांच्या मनात समाजातील गरजवंताना मदत करण्यासाठी नेहमीच धडपड असते.तसेच या कोरोना काळात सुद्धा मदत करण्यासाठीची धडपड खूप चांगली आहे.प्रतिक्षाने तिच्या वाढ दिवसांच्या निमित्ताने तिच्या मित्रांच्या साहाय्याने काही रक्कम जमा करून संस्थेला धान्याच्या स्वरूपात मदत केली.
प्रतिक्षाने तिच्या काॅलेज मित्रांना संस्थेत आणल्या बद्दल आणि तिचा वाढ दिवसांच्या निमित्ताने केलेल्या मदती बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.



Date - 26/03/2020

            नमस्कार , समाजातील माझ्या सर्व लहान बाळापासून ते वडीलधाऱ्या व्यक्तींना कळकळीची विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाबरोबर शक्य होईल तेवढ बाहेरील व्यक्तींची सुद्धा काळजी घ्यावी त्याचे कारण संपूर्ण जगाला ,देशाला ,राज्याला , खेडेगावातील लोकांना तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की , कोरोना वायरस मुळे संपूर्ण जगाची किती वाईट , गंभीर आणि आपल्या आटोक्या बाहेरची परिस्थिती झालेली आहे .
खरोखरच कोरोना वायरस बरोबर दोन हात करायचे असेल तर याला एक रामबाण उपाय म्हणजे आपणच आपल्या स्वतः ची काळजी घेणं आणि आपल्या घरातच आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं झाल आहे .
         आता मला आपणांस एक समाजातील दुसऱ्या बाजूचे सत्य पण विधारक परिस्थिती मांडण्याची समाजातील लहानपासून माझ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना परवानगी मागत आहे. त्याचे कारण असे की, वृद्धाश्रमातील आजी ,आजोबांना आजच्या या कोरोना वायरसच्या परिस्थितीत सांभाळण्याचा मोठा गंबीर प्रश्न निर्माण होत चालला आहे कारण की साठ वर्षापुढील आजी - आजोबांची सेवा करतांना खूप अडचणी निर्माण होत आहे , यामध्ये आजी, आजोबांच्या दैनंदिन सेवा करत असताना पाण्यापासून ते त्यांच्या डायफर , मास्क , डेटॉल आणि इतर महत्वाच्या मेडिकल वापरामध्ये आमच्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे . ही सेवा करत असताना या आजी ,आजोबांना सांभाळण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या नात्यवाईकांनी घरी घेऊन जाण्यास नकार दिलेला आहे . यामुळे या सर्वांची सेवा करण्याची जबाबदारी मोठी झालेली आहे .
         विशेष म्हणजे आम्ही कोणालाच दोषी ठरवू शकत नाही कारण आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य परमेश्वराने आम्हांला भरभरून दिलेलं आहे . त्याच बरोबर समाजातील प्रत्येक व्यक्तींचे मोलाचे सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे . आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ,की घरा बाहेरही पडता येत नाही आणि बाहेर रस्त्यावर आल्यावर काय चित्र अनुभवायला मिळत आहे हे तुम्ही सर्वजण पाहत आहात . यासाठी मला माझ्या सरकारला अशी विनंती आहे की , कोरोना वायरसच्या परिस्थितीत सामाजिक काम करत असणाऱ्या व्यक्तीना काहीतरी एक प्रकारे ओळख पत्र देऊन त्या व्यक्तींना समाजाची सेवा करण्याची संधी दयावी ही विनंती.
        आज आपल्यासमोर ही पोस्ट टाकत असताना समाजातील लहान बाळापासून ते वडीलधाऱ्या व्यक्तींचे मन दु:खवण्याचा माझा व्यक्तिशः कोणताच हेतू नाही . जर यामुळे कोणाचे मन दु:खावले गेले असेल तर आपण सर्वांनी मला मनापासून माफ करावे ही कळकळीची विनंती.


आपला सेवक .

श्री . केशव धेंडे (सर) आणि नलिनी धेंडे
संस्थापक अध्यक्ष- निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महम्मद वाडी, हडपसर, पुणे.
(International CSR Award Wining NGO, Pune. Date- 18 Feb. 2019 & Date - 18 Feb. 2020 )
Mo.No - 9561816451


Date - 29/07/2020
          नमस्कार, सर्वानी मनापासून आपल्या स्वत च्या तब्येतीची काळजी घ्यावी हि विनंती.
         आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की माझ्या संस्थेच्या आश्रमातील मुलगा कु. चैतन्य होमकर याला दहावीच्या परीक्षेत एकूण 66 टक्के गुण मिळवून पास झाला आहे. आणि याचा मला खूप अभिमान आहे. चैतन्य आणि प्रणव हे दोघे भाऊ यांच्या बद्दल सांगायचे तर हे खूप गरीब घरातील असून लहानपणीच यांची आई देवाघरी निघून गेलेली होती. आणि सतत आजारी पडणारे वडील यांच्यावर या दोघांची जबाबदारी येऊन पडली. 10 बाय 10 च्या खोलीत राहत होते, तसेच एक वेळ वडापाव आणि रात्री खानावळीचा डबा यावर यांची गुजरान चालत होती. ज्यावेळी शेजारच्या लोकांनी आम्हाला कळविले तेव्हा लगेचच दुसऱ्या दिवशी सांगलीत जाऊन बरोबर घेऊन आलो. प्रणव हा मोठा आणि चैतन्य छोटा होता तसेच मोठा भाऊ आज ITI पास झाला आहे व तो आता नोकरीला लागेल. तो आमच्या संस्थेच्या वृदधा श्रमात आजींची सेवा करतोय.
        मला आपणांस एवढेच सांगायचे आहे की मी आणि माझ्या मिसेसने जबाबदारी घेऊन शिक्षणासाठी मदत करून आई वडील यांचे प्रेम देऊन मनापासून सांभाळले आहे.
चैतन्य यास माझ्या संस्थेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो.

Date - 10/12/2019

         नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी तिबेट वरुन " Tibet Association " चे आदरणीय दलाई लामा यांचे जुने शिष्य मा. निमा समडूप आणि श्री. अभिषेक अवचर सर ( India Tibet Friendship Society - National President ITFS ( Youth & Student. ) तसेच त्यांचे सहकारी मा. प्रियंका चौधरी मॅडम हे सर्व जण आले होते.
     आदरणीय निमा यांना संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आणि चर्चा करण्यात आली. या ठिकाणी निमा सर फक्त वीसच मिनिटे होते पण त्यांच्या या ठिकाणी येण्याने खूप छान वातावरण निर्माण झाले होते.
      आदरणीय माझे मित्र मा. श्री. अभिषेक अवचर सरांनी निमा सरांना बरोबर घेऊन आले होते. आणि यासाठी खास करून माझे आदरणीय मित्र मा. श्री. बाळासाहेब रासते सर यांनी या सर्वांना माझ्या संस्थेत पाठविले होते या बद्दल मी विशेष त्यांचे आभार मानतो.

DATE - 02/04/2021 -  GANGA TARA OLD AGE HOME VISIT.

Type your paragraph here.

Date - 16/06/2019

       नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुणे येथील ZinZout Teletech , Pune. या कंपनीचे संचालक मा.श्री.मयुर राऊत सर आणि Sinhgad Institute Of Technology , Lonavala येथील काॅलेजचे स्टुडंट्स आले होते.
या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच इतर प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.दोन तास संस्थेत थांबून सर्व मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मुलाला बक्षिस दिले.या ठिकाणी कंपनीतील सर्वांना खूप छान वाटले तसेच त्यांच्या नवीन कंपनी विषयी सविस्तर माहिती दिली.
    ZinZout Teletech,Pune. या कंपनीचे मा.श्री.मयुर राऊत सर आणि स्टुडंट्स संस्थेच्या भेटीसाठी आल्या बदल आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो.

DATE - 31/01/2021-  BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS


Date - 11/08/2020
      नमस्कार आज संस्थेमध्ये आमचे आदरणीय सहकारी PSI Supriya Pandharkar, मॅडम आणि Mahadev Shinde साहेब आले होते.
         सुप्रिया मॅडम यांनी यायचे कारण म्हणजे त्यांच्या शासकीय सेवे बरोबर सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांना फार आवड आहे. याच कारणामुळे मॅडमांनी स्वतःचा वाढ दिवस माझ्या संस्थेत साजरा केला आणि त्यांची छोटी भाची हिच्या वाढ दिवसांच्या निमित्ताने अन्नदान केले.

      मॅडम आणि त्यांचे सहकारी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.

Date - 30/03/2019
       नमस्कार आज संस्थेला भेट देण्यासाठी धनकवडी,पुणे येथील " Pune Institute Of Computer Technology " या काॅलेजचे तरुण विद्यार्थी आले होते.हे सर्व विद्यार्थी संस्थेत आल्यावर त्यांना समाज कार्याची अर्धा तास माहिती आणि मार्गदर्शन केले.या तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक वेगळाच अनुभव मिळाला. त्यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या.खरोखरच आजची तरुण पिढी समाज कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
     संस्थेत सर्व विद्यार्थी आल्या बद्दल आम्ही सर्वजण काॅलेजचे आणि सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे मनापासून आभार मानतो
.


Date - 04/07/2020
       नमस्कार आज संस्थेला भेट देण्यासाठी माझे आदरणीय मित्र श्री.निहाल कांबळे सर आणि त्यांचे मित्र फिल्म डायरेक्टर यांना बरोबर घेऊन आले होते.
आदरणीय पाहुणे मंडळी येण्याचे कारण म्हणजे रशिया येथे झालेल्या " द इंडिया आयकाॅन 2020 " फॅशन स्पर्धेत उपविजेतेपद मिळालेल्या हडपसर, पुणे येथील कन्या मिस सुफिया शेख यांचा आज वाढदिवस होता. या वाढ दिवसांच्या निमित्ताने सामाजिक भान ठेवून " रक्तदान, वृक्षरोपन आणि अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप याचे नियोजन करून साजरा करण्यात आला.

    खरोखरच मिस सुफिया हिचे आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तींचे कौतुक करावेसे वाटते की आजच्या कोरोनाच्या वाईट परिस्थिती मध्ये बाहेर वायफळ खर्च न करता एका चांगल्या सामाजिक गोष्टीतून वाढ दिवस साजरा करण्यात आला. या बद्दल माझ्या संस्थेच्या वतीने तिचे मनापासून अभिनंदन करतो.तसेच माझ्या संस्थेत या सर्वांना आणल्या बद्दल आम्ही सर्व जण यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 10/09/2020
        नमस्कार आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की संस्थेचे कार्य पाहून पुण्यातील हिंजवडीतील नामांकित CSR कंपनीचे HR विभागातील व्यक्ती आणि त्यांचे इतर सहकारी भेटायला आले होते. मला फार छान वाटले की माझ्या संस्थेच्या कोरोना मध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच संस्थेतील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी Masks देण्यासाठी CSR कंपनीची टिम आली होती.
     CSR टिम संस्थेत आल्यावर त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि त्यांना संस्थेचे कार्य फार आवडले.जाताना आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानले.


Date - 19/08/2019
         नमस्कार आपणांस सांगण्यास आनंद होतो आहे की आज संस्थेच्या भेटीसाठी " Miss Vadodara - 2018 " Gujarat. यामध्ये प्रथम आलेल्या मिस.अक्षिता सिंग मॅडम आल्या होत्या. विशेष म्हणजे संस्थेला मिळालेल्या " International Award " मुळे त्यांनी भेट देण्यासाठी मला फोनवर विनंती केली होती आणि त्यांच्या या विनंतीवरून त्यांना संस्थेत बोलवले होते तसेच संस्थेत आल्या वर त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली संस्थेत येण्याचे कारण म्हणजे..
         अक्षिता मॅडम " Under Privileg Children " या Project साठी भारताकडून China या ठिकाणी होणाऱ्या इव्हेंट साठी त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माझ्या संस्थेला आज सोळा वर्षे पूर्ण होत असतानाच या काळातील अनुभवाच्या बेसवर त्यांना मी छान मार्गदर्शन केले आहे आणि याचा त्यांना नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं.
अक्षिता मॅडम संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.


Date - 15/07/2021
     नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज माझ्या संस्थेच्या वतीने माझ्या संस्थेत काम करणाऱ्या एका अनाथ मुलीचा विवाह करून देण्यात आला आहे. हि मुलगी स्वतः एका अनाथ आश्रमा मध्ये लहानपणापासून राहून मोठी झाली होती. ती अनाथ आश्रमात असतानाच तिने लग्न केले होते. पण काही वर्षांनी तिचे मिस्टर देवाघरी गेले होते.आठ वर्ष झाली होते तिचे मिस्टर देवाघरी गेलेले. आणि तिचे आता वय पंचवीस असल्याने किती दिवस एकटी राहणार या विचाराने मी तिचे लग्न करुन द्यायचे ठरविले.
     तिच्या नशिबाने तिला एका कुटुंबाने आसरा दिला होता आणि त्याच कुटुंबातील मोठ्या मुला बरोबर तिचे आज लग्न लावून देण्यात आले आहे. आम्हाला अभिमान वाटला की आपण एका अनाथ मुलीचा विवाह करून दिला आहे.तसेच तिचा आशिर्वाद आमच्या साठी खूप मोठा आहे.

Date - Date - 21/12/2019

      नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी खास पाहुणे आले होते. हि पाहुणे मंडळी बिहार - पटना येथील होती. यांच्या बद्दल सांगायचे म्हणजे या तीन मुलींना त्यांच्या आईने लहान पानांपासून सांभाळून चांगले संस्कार दिले आणि मोठे केले. मोठी कन्या IT कंपनीत कामाला आहे तर मधली कन्या सरकारी कामाला आहे आणि सर्वात शेवटची कन्या आता सध्या B Tec. मध्ये शिकत आहे.
         हे सगळं सांगण्याच्या मागे कारण असं की या मुलींचे वडीलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडीलांच्या निधनानंतर आईनेच या तिघीना चांगले संस्कार देऊन लहानाचे मोठे केले. घरात वडीलांच्या मागे आईला धरुन या मुलींनी स्वतःला सावरत शिक्षण पूर्ण केले आणि आईला मोठा आधार दिला आहे. खरोखरच या सर्वांना माझा मनापासून सलाम.

Date - 10/03/2022
   नमस्कार तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने माझी " Education LAW Toor, Date - 01/03/2022 To 08/03/2022 " Dellhi, Kulu Manali, Hidimba Temple, Golden Temple - Jallianwala Bagh- Amritsar, Attari - Wagha Border - India - Pakistan या ठिकाणी गेली होती.
   आणि या अभ्यास सहल मध्ये आम्ही एकुण 48 विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.जाताना आम्ही सर्व जण ट्रेन मधून गेलो होतो. सर्व जण प्रथम इंडिया गेट पाहिले आणि मग दुसर्या दिवशी सुप्रीम कोर्टला भेट दिली.या ठिकाणी सुप्रीम कोर्टातील सिनीअर वकीलांनी काम कसं चालतं याची माहिती आम्हाला सांगितली. आणि नंतर राष्ट्रपती भवनला बाहेरून पहाता आले. हि महत्वाची अभ्यास व्हिजीट झाली आणि सर्वांना खूप छान वाटले.
    नतर आम्ही सर्व जण फिरण्यासाठी कुलु मनाली हिमाचल प्रदेश येथे गेलो. त्या ठिकाणी आम्हाला बर्फात खेळण्याचा खूप आनंद मिळाला. सर्वांनी खूप खूप एन्जॉय केला. एकमेकांच्या अंगावर बर्फ फेकून खेळत होते. नंतर आम्ही सर्व जण हीडिमबा टेंपल पाहिले. नंतर आम्ही सर्व जण अमरूतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली त्या ठिकाणी मी लंगर मध्ये प्रसाद घेतला. नंतर संध्याकाळी चार वाजता अटटारी - भारत पाकिस्तान सीमा या ठिकाणी कार्यक्रम पाहिला. त्या ठिकाणी आपले भारतीय जवान यांनी केलेले संचालन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. जो व्यक्ती हा कार्यक्रम पाहिल त्यांच्या डोळ्यांतुन अश्रु आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या भारताविषयी अभिमान वाटतो. दुसर्या दिवशी आम्ही संध्याकाळी सहा वाजता दिल्ली वरुन विमानाने मुंबईला साडे आठ वाजता पोहोचलो. आणि अशाप्रकारे आमची सहल संपली.
    खरोखरच एकंदर आमची हि काॅलेजची अभ्यास सहल खूप खूप छान झाली.या बद्दल मी मनापासून काॅलेजचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो.
Keshav Dhende, Sir (BA.LLB)


Date - 27/10/2019

     नमस्कार सर्व प्रथम समाजातील माझ्या सर्व आदरणीय गुरुजनांना आणि बंधू भगिनींना तसेच छोट्या मंडळींना मनापासून दिपावलीच्या व लक्ष्मी पुजणा निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा व प्रेम माझ्यावर असू द्या ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.
   आज सामाजिक क्षेत्रात 17 वर्ष पूर्ण होत आहेत.समाजात कार्य करत असताना खूप काही चांगले वाईट अनुभव आले पण मी त्याची पर्वा न करता माझं कार्य पुढे चालू ठेवले आहे.आणि शेवटच्या क्षणापर्यंत असेच कार्य चालू ठेवणार आहे.

आपला.
केशव धेंडे, सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर, पुणे. - 60
(International CSR Award Winning NGO - Feb - 2019)


Date - 10/08/2019
       आज संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी माझे आदरणीय विलास लोंढे सर आणि त्यांचे लहानपण चे आदरणीय मित्र मंडळी डॉ. विरेंद्र जेऊरकर आणि शरयु जेऊरकर मॅडम तसेच खंडे दादा आले होते.
    संस्थेत आल्यावर खूप छान गप्पा गोष्टी झाल्या. सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.तसेच संस्थेला जागतिक पातळीवर पुरस्कार मिळाला त्या बद्दल माझे अभिनंदन केले. एकंदरीत आदरणीय मोठे व्यक्ती संस्थेत आल्या बदल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

DATE - 01/08/2020 - RAKSHA BANDHAN CELEBRITE AT NIRANKAR

Date - 27/09/2021
    नमस्कार काल संस्थेच्या भेटीसाठी UPS Logistics Pvt, Company, (USA) Magarpatta, Hadapsar, Pune. या IT कंपनीतील सामाजिक क्षेत्रांत योगदान करण्याची आवड असणारी तरूण समाज सेवक मंडळी आली होती. येण्याचे कारण म्हणजे कंपनीने CSR Activities साठी निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या माझ्या संस्थेची निवड केली.या मध्ये या तरुण मंडळींनी संस्थेच्या मुलांच्या बरोबर खुप काही छान Activities केल्या तसेच स्पर्धा घेऊन सर्व मुलांना बक्षिसे दिली. सर्व मंडळींना संस्थेत मुलांच्या बरोबर खुप मजा केली. अशाप्रकारे संस्थेबरोबर एक छान CSR Activities झाली.
     तसेच दुसर्या फोटोतील IT कंपनीतील तरुण युवक संस्थेच्या भेटीसाठी आले होते. या तरुण युवकांनी त्यांच्या जीवलग मैत्रीणीचा वाढ दिवस सर्व मुलांच्या बरोबर साजरा केला. या तरुणांनी सर्व मुलांच्या बरोबर खुप मजा केली.
वरील सर्वांचे संस्थेच्या वतीने आम्ही मनापासून आभार मानतो.


Date - 03/08/2019

         नमस्कार आज संस्थेला भेट देण्यासाठी हडपसर येथील " The British Institute's , Hadapsar, Pune." येथील तरुण समाजसेवक आले होते.आल्यावर या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. भरपूर चर्चा झाली आणि भविष्यात संस्थेसाठी मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. तसेच या सर्वांनी मिळून संस्थेला मदत केली.
        संस्थेच्या भेटीसाठी आलेल्या तरूण समाज सेवकांचे आम्ही सर्व जण मनापासून धन्यवाद मानतो.


Date - 18/01/2021
       नमस्कार आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की संस्थेच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन " KALYANI TECHNOFORGE LIMITED " Mundhva, Pune. या कंपनीने CSR activiti मध्ये निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर , पुणे. या संस्थेची निवड करण्यात आली.
      या CSR ACTIVITI मध्ये कंपनीतील सर्व कामगारांना बरोबर घेऊन पुण्यातील एका संस्थेला अन्नधान्याच्या स्वरूपात मदत उपलब्ध करून देणे असे ठरले होते.आणि मग त्यांनी माझ्या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला मदत केली. या बद्दल आम्ही सर्व जण कंपनीतील आदरणीय " शिक्षा मिश्रा " मॅडम आणि कंपनीचे CSR Head " आदरणीय श्री.सुमित जाधव सर तसेच कंपनीतील सर्वांचे मनापासून आभार मानतो.


Date - 09/07/2020 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 07/12/2019

       नमस्कार आज संस्थेत महाराष्ट्रातील विविध गावांतील तरुणाई भेटण्यासाठी आली होती. या सर्वांना पाहून मला आनंद झाला आणि मनाला खूप एक प्रकारे समाधान वाटलं.
        हि सर्व तरुण मंडळी संस्थेत येण्याचे कारण म्हणजे त्यांच्यातील एक मैत्रिण मनालीचा वाढ दिवस संस्थेत साजरा करण्यासाठी. खरोखरच या सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मनालीचा वाढ दिवस सर्वांच्या बरोबर केक कापून साजरा करण्यात आला. तसेच सोबत आणलेल्या भेट वस्तू व खाऊ सर्वांना दिल्या.
      आज मी या ठिकाणी एकच मनापासून सांगू इच्छितो की आजची तरुण पिढी समाज कार्यासाठी स्वतः हून पुढं येत असलेली दिसत आहे.आणि त्यांच्या या कार्यासाठी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.तसेच माझ्या संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.



DATE - 05/06/2021 -  VAISHALI MADAM BIRTHDAY PROGRAM CELEBRATIONS

DATE - 02/11/2021 - NIRANKAR BALGRAM DAPOLI KONKAN TRIP.

Date - 14/05/2021
       नमस्कार सर्वांना प्रथम माझ्या संस्थेच्या वतीने समाजातील सर्वांना मनापासून अक्षय तृतीया निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आज संस्थेच्या भेटीसाठी हडपसर मधील " पोलिस मित्र समिती "( महाराष्ट्र राज्य ) या समितीतील मान्यवर मंडळी आली होती. विशेष म्हणजे या समिती मध्ये सर्व तरुण समाज सेवक होते आणि त्यांच्यातील प्रत्येक जण समाज सेवा करण्यासाठी धडपडत होते असं दिसून आलं.
  या पोलिस मित्र समितीचा उद्देश आहे की राज्यभरातील पोलिसांना व सर्व सामान्य जनतेला वेळोवेळी मदत व्हावी या हेतूने समाजाच्या सेवेसाठी कार्य करणारी पोलिस मित्र समिती सम्पूर्ण राज्यभर कार्य करते. या तरुण समाज सेवकांचे आजच्या वाईट परिस्थितीत समाजाला मदत करण्यासाठीची चाललेली धावपळ पाहून खरोखरच मनाला एक समाधान वाटले आणि या कारणांमुळे या सर्व तरुण मंडळीना माझ्या संस्थेच्या वतीने सलाम करतो. तसेच माझ्या संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.


Date - 16/08/2021
    नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेच्या वतीने गरीब संस्थेला धान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कोराना काळात बर्याचशा संस्थांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले आहे.आणि माझ्या संस्थेच्या वतीने अशा संस्थांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत होते आहे हेच माझं भाग्य आहे.
विशेष म्हणजे या संस्थेला कधी पाहण्याचा किवा काही संपर्क होण्याचा संबंध नाही आला. पण मागे कधीतरी "जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठान, राशीन, संचालित संस्कार विद्यार्थी निवासी वसतिगृह, तालुका - कर्जत,जि.अहमदनगर. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्र आढाव,सर यांचा मला फोन आला की आम्हाला धान्याच्या स्वरुपात मदत केली तर बरं होईल. मी लगेचच त्यांना होकार दिला आणि सांगितले जेव्हा कधी पुण्याला येणार आहे त्यावेळी माझ्याकडे या म्हणजे तुम्हाला मला धान्याच्या स्वरुपात मदत होईल. आणि आज सरांनी मला शोधत संस्थेत आले आणि मी दिलेला शब्द पाळला. व त्यांना मदत केली आहे.
    या मदतीमागे मी देणारा कोणी दाता नाही तर माझ्या संस्थेला मदत करणारे माझे आदरणीय दाते हे परमेश्वर आहे म्हणून मी सर्वांना माझ्या मुलांच्या घासातील घास या गरीबांना मदत करू शकतोय. धन्यवाद.


Date - 23/06/2019
        नमस्कार आज संस्थेच्या कार्याची दखल घेऊन CHENNAI ( मद्रास हे पूर्वीचे नाव ) येथील BHUMI ORGANIZATION या संस्थेचे प्रतिनिधी भेट देण्यासाठी आले होते.
Anany Bhattacharya आणि Heena Tangree ( National Support Team ) या दोन मॅडम आल्या होत्या. संस्थेत आल्यावर त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि या पुढे संस्थेचे भविष्यात होणाऱ्या प्रकल्पाची माहिती घेतली. संस्थेत येण्या मागील कारण म्हणजे संस्थेच्या मुलांना Spokan English चे क्लासेस घेऊन त्यांना बोलता आणि लिहिता यावे यासाठी प्रयत्न करणे हा होता.
BHUMI या संस्थेचे प्रतिनिधी आल्या बदल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

DATE - 07/06/2019 - CSR PROGRAM IN COMPANY, MAGARPATTA , HADAPSAR, PUNE.

Date - 29/07/2021
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील तरुण पाहुणे मंडळी आले होते. त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती जवळून पहायची होती म्हणून आले होते.या तरुण पाहुणे मंडळींना संस्थेत आल्यावर फार छान वाटले. तसेच या सर्वांना माझ्या आणि संस्थेच्या कार्याची माहिती दिली. भविष्यात संस्थेला मदत करण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. जाताना त्यांनी संस्थेला किराणा सामान भेट स्वरूपात दिला.
    पाहुणे मंडळी संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
Type your paragraph here.

DATE - 14/06/2019 - CSR PROGRAM IN COMPANY, MAGARPATTA , HADAPSAR, PUNE.

Date - 26/11/2019
         नमस्कार आज मी माझ्या हृदयापासून समाजातील प्रत्येक आदरणीय व्यक्तींना की ज्यांनी काल दिनांक - 25/11/2019 रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून प्रेमाने शुभेच्छा दिल्या आहेत त्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरोखरच मी आपल्या सर्वांनी मिळून दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेम ह्यांच्या ओझ्याने दबलो आहे. आपल्या सर्वांचा मी पुढच्या वर्षी येणाऱ्या वाढ दिवसांपर्यंत रुणी राहिलं.
         आज सतरा वर्षांच्या परिश्रमातून मला व माझ्या संस्थेला ( International CSR Award - Feb - 2019 ) मिळाला आहे आणि हे सर्व शक्य झाले आहे ते तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने.आज या निमित्ताने आपणांस सांगू इच्छितो की आता राहिलेली पुढील थोडीफार आयुष्य ह्याच समाज कार्यासाठी घालवणार आहे.या साठी फक्त मला तुम्हा सर्वांचे मनापासून आशिर्वाद पाहिजे.
        शेवटी जाता जाता मी एवढंच सांगतो की आपण काल दिवसभरात आणि आजपण शुभेच्छा येत आहेत यामुळे मला सामाजिक कार्यात नवीन संजीवनी मिळाली आहे या बद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.

कळावे.
आपला.
केशव धेंडे,सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर, पुणे.
फोन नंबर - 9561816451.

DATE - 05/06/2019 -   CHILDRENS  ACTIVITY

Date - 18/04/2022
नमस्कार मनापासून आपणांस सांगण्यास आनंद वाटतो की आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या प्रामाणिक कार्याला समाजातील सर्व साधारण व्यक्ती ते आदरणीय मोठे दानशूर व्यक्ती यांचा जेव्हा आपल्या सामाजिक कार्याला मनापासून मोठा पाठिंबा मिळतो तेव्हा एक गोष्ट नक्कीच निर्माण होते ते म्हणजे आपण गरीब व समाजापासून वंचित असणार्या लोकांसाठी कार्य करतो त्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होते.
याचे आत्ताचे उदाहरण म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती "प्रविण मसालेवाले " माझे आदरणीय सर श्री. राजकुमार चोरडिया हे आहेत. यांनी माझ्या संस्थेला 2011 रोजी वर्षभर पुरेल इतके धान्य घेण्यासाठी दर महिन्याला मोठी आर्थिक मदत करत होते.या मदतीमुळे त्यावेळी मला खूप मोठा आधार मिळाला होता. आणि म्हणूनच मी माझ्या सर्व मुलांना चांगल्या प्रकारचे दर्जेदार अन्न खायला घालू शकलो होतो.
तसेच अकरा वर्षापूर्वीचा जो विश्वास माझ्यावर होता त्याच विश्वासाला पात्र होत परत एकदा त्यांनी मला मोठ्या मनाने नवीन अनाथ आश्रमाला लाईट घेण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. आणि आम्ही खरोखरच त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि विशेष सांगायचे म्हणजे माझे आदरणीय सर श्री. गिरीश क्षिरसागर (प्रविण मसालेवाले कंपनी) यांचे या कार्यासाठी मोठी मोलाची मदत झाली आहे. त्यांच्या मुळेच हे सर्व शक्य झाले आहे. आणि यासाठी आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)


   Date - 18/08/2019 - BIRTHDAY CELEBRATION

DATE - 18/08/2020 - VADGAOSHERI PRATHISTHAN - KORONA MASK DISTRUBUTION

Date - 31/07/2021
      नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील विविध काॅलेज मधील तरुण विद्यार्थी आणि ते लहानपणापासूनचे मित्र मैत्रिणी असलेले तसेच आता सध्या कोण काॅलेज मध्ये शिकत आहेत तर एक मैत्रीण UPS चा अभ्यास करत आहेत. असे विद्यार्थी संस्थेच्या भेटीसाठी आले होते.
  विशेष म्हणजे आत्ताच्या तरुण पिढी मध्ये सामाजिक क्षेत्रात काहितरी करून दाखवण्याची तसेच आपापल्या परीने मदत करण्याची धडपड दिसून येत आहे. असे या तरुण विद्यार्थी जे देशाचे भवितव्य घडविण्यासाठी धडपडत आहे अशा या विद्यार्थ्यांना माझ्या संस्थेच्या वतीने मनापासून सलाम. तसेच माझ्या संस्थेच्या भेटीसाठी आलेल्या तरुण काॅलेज विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो.


DATE - 03/11/2021 - NIRANKAR BALGRAM DAPOLI KONKAN TRIP.

Date - 13/06/2019 - BIRTHDAY CELIBRATION

Date - 19/07/2019
       नमस्कार काल सायंकाळी गुरू पोर्णिमेच्या एका कार्यक्रमासाठी मला माझे आदरणीय लोंढे सर यांनी खास आमंत्रण दिले होते.या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री. अर्जुन दांगट सर ( राज्य बाल आयोग, महाराष्ट्र राज्य ) तसेच आता सध्या CWC, पुणे या पदावर कार्यरत आहेत.तसेच मा.श्री.वाय.जी.पवार साहेब, हडपसर हे होते.
      विशेष म्हणजे मी ज्या संस्थेत अनाथाश्रमात होतो त्या वेळी 1984 साली दांगट सर आम्हाला भेटायला संस्थेत यायचे.आणि आता 35 वर्षांनी माझी त्यांच्या बरोबर भेट झाली. या कारणांमुळे जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला तसेच त्या काळचे माझे लहानपणीचे दिवस आठवले.आणि हे केवळ शक्य झाले ते माझे आदरणीय लोंढे सर यांच्या मुळे. आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या.

DATE - 22/08/2020 - GANESH FESTIVAL IN NIRANKAR BALGRAM

Date - 12/09/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Date - 17/01/2022
     नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी "EON IT PARK, KHARADI, NOBLE HOSPITAL, HADAPSAR,PUNE. येथील माझे आदरणीय अधिकारी सहकारी आले होते. संस्थेत येण्याचे कारण म्हणजे आदरणीय कु. यादवी टाले मॅडम यांचा वाढदिवस संस्थेच्या मुलांच्या बरोबर साजरा करण्यासाठी. माझ्या सर्व मुलांच्या बरोबर यादवी मॅडम यांनी केक कापून साजरा केला. तसेच या निमित्ताने सर्व मुलांना अन्नदान करण्यात आले आहे.
    विशेष सांगायचे म्हणजे दिवाळीच्या मध्ये सर्व मुलांना थंडीसाठी जरकिन घेतले होते यासाठी आदरणीय श्री. प्रदिप रावणकर सर आणि आदरणीय कु. यादवी टाले मॅडम यांनी मोठी मदत केली होती. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी माझे आदरणीय मित्र डॉ.श्री. सुर्यकांत शेळके सर यांचे मला सहकार्य मिळाले आहे या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.